सन 2023-24 मधील दिपावली सुट्यांबाबत राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये (शिक्षण विभाग) मध्ये समानता येण्यासाठी आपले स्तरावरुन दि. 09/11/2023 ते 25/11/2023 या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्याबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांना मार्गदर्शन करणे बाबत पुढील प्रमाणे विनंती केली आहे.
शिक्षण आयुक्तालयाचे पत्रासोबतच्या सहपत्रान्वये श्री.तानाजी कांबळे, मुंबई जिल्हाध्यक्ष व श्री. आलिमोद्दिन सय्यद, मुंबई सचिव, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना, मुंबई यांनी दिवाळीच्या सुट्टीबाबत राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे निदर्शनास आणून दिलेले आहे. तसेच संदर्भ क्र.2 येथील पत्रान्वये श्री. शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांनीही दिपावली सुट्टीबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये समानता आणून त्याबाबत पत्रक जाहीर करण्याबाबत विनंती केली आहे.
संदर्भीय पत्रान्वये संबंधितांनी दिपावलीच्या सुट्ट्यांबाबत राज्यातील जिल्हा परिषद (शिक्षण विभागा) मध्ये एकवाक्यता नसल्याची बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. सबब, दिपावलीच्या सुट्ट्यांबाबत शासन स्तरावरुन आदेश व्हावेत, ही विनंती.
( दिपक चवणे)
शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
वरील परिपत्रक PDF Download 👇
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments