टप्प्याटप्प्याने सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पुढील महिन्यात! अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन प्रशिक्षण वेळापत्रक

राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र च्या दिनांक नऊ नोव्हेंबर 2023 च्या परिपत्रकानुसार वर्ग एक ते आठ ला शिकवणाऱ्या शिक्षकांची अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण आयोजनाबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.


STARS प्रकल्प सन २०२३-२४ अंतर्गत अध्ययन प्रक्रियेचे व सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील इयत्ता १ ते ८ च्या सर्व शिक्षकांना द्यायचे आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी ०५ दिवस असून अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे राज्यस्तर प्रशिक्षण पहिला टप्पा दिनांक २४ ते २७ सप्टेबर २०२३ व दुसरा टप्पा दिनांक १८ ते २२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पूर्ण झाले आहे. विभागस्तर प्रशिक्षण निवासी स्वरुपात दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी विभागीय डायट प्राचार्य यांची राहील. त्यांना प्रशिक्षण स्थळ निवड व आयोजन यासाठी विभागीय उपसंचालक यांनी सहकार्य करावयाचे आहे. सर्व जिल्हा डायट प्राचार्य यांनी प्रति BRC/URC अशा ०९ व्यक्तींची निवड करून यादी प्राचार्य विभागीय DIET यांना द्यावी. या प्रशिक्षणासाठी सहभागी प्रशिक्षणार्थी हे प्रत्येक जिल्ह्यातील प्रती BRC/URC ०९ व्यक्ती असणार आहेत. सदर ०९ व्यक्तींची निवड करताना जि.प., म.न.पा./न.पा./न.प., आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळा, खाजगी अनुदानित या सर्वच शाळांचे शिक्षक/ मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील अधिव्याख्याता व विषय सहायक यांचा समावेश करावा.

विभागस्तर प्रशिक्षणानंतर तालुकास्तर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे एकूण ०५ दिवसांचे असेल. सदर प्रशिक्षणामध्ये शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा (जि.प., म.न.पा./न.पा./न.प.), आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांचा समावेश असेल. सदर प्रशिक्षण तीन टप्यात पूर्ण होईल. इयत्ता १ ली ते ५ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाच्या संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे आहेत 

१. टप्पा दि. ०४ ते ०८ डिसेंबर २०२३

२. दुसरा टप्पा दि. ११ ते १५ डिसेंबर २०२३

३. तिसरा टप्पा दि. १८ ते २२ डिसेंबर २०२३

इयत्ता ६ वी ते ८ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाच्या संभाव्य तारखा यथावकाश कळविण्यात येतील.

विभागस्तर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी विभाग स्तरावरील DIET प्राचार्य यांच्यावर असणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रती प्रशिक्षणार्थी प्रती दिन रक्कम रु. १५००/- प्रमाणे निधी विभागीय DIET यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. सोबत विभागनिहाय अपेक्षित प्रशिक्षणार्थी तज्ज्ञ व वर्ग संख्या याचा तक्ता जोडला आहे. दि. २२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रशिक्षण स्थळ व प्रशिक्षणार्थी संख्या विभाग स्तरावरील DIET प्राचार्य यांनी SCERT या कार्यालयास ssa@maa.ac.in या मेलवर व संबंधित जिल्ह्यांचे DIET प्राचार्य आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक / प्रशासनाधिकारी मनपा यांना कळवावे.

सर्व जिल्ह्यातील DIET प्राचार्य यांनी दि. २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत संबधित सर्व प्रशिक्षणार्थी यांना विभाग स्तरावरील निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहणे बाबत आदेशित करावे.


(मा. संचालक यांच्या मान्यतेने)

 (रमाकांत काठमोरे)

सहसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. 


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.