महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी १) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे, २) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे, ३) शिक्षण संचालक (माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
राज्यात पूर्वी मागास प्रवर्गाचे प्रशिक्षीत उमेदवार मिळत नसल्यामुळे अप्रशिक्षीत शिक्षकांच्या नियुक्त्या आल्या आहेत. सेवेत असतांना ते प्रशिक्षीत झालेत. त्यांना त्यावेळी अप्रशिक्षीत वेतन श्रेणी होती. त्यांना नियुक्ती दिनांकापासुन खालील लाभ मिळावेत.
१) निवड व वरीष्ठ श्रेणीसाठी नियुक्ती दिनांक ग्राह्य धरणे,
२) दि.०१.११.२००५ पुर्वी नियुक्ती असल्यामुळे जुनी पेंशन योजना लागू करणे,
३) इतर सेवा विषयक लाभ.
उपरोक्त विनंतीच्या अनुषंगाने आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास सादर करावेत, ही विनंती.
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments