शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयातून दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा तुकड्यांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कार्यवाही तात्काळ करणे तसेच अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यासाठी प्रस्ताव सादर करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत..
शासनाने शासन निर्णय दि. 06/02/2023 मधील अ, ब व क मध्ये नमुद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व त्यामधील वर्ग/तुकड्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून अनुदानास पात्र घोषित केले आहे व दि. 01/01/2023 पासून अनुदान अनुज्ञेय करण्यात आलेले आहे. अनुदानाची कार्यवाही शीघ्रतेने व्हावी याकरिता शासनाने शासन परिपत्रक दि.24/04/2023, दि. 25/09/2023 व शासन पत्र दि. 26/09/2023 अन्वये सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
सदर शासन निर्णय/परिपत्रक व शासन पत्रातील अटी व शतीनुसार अनुदान पात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची तपासणी करुन त्यावरील पात्र शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान मंजूर करण्याबाबतची कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत दि.31/12/2023 पर्यंत पूर्ण करावी. अशी कार्यवाही करत असताना कोणत्याही शिक्षकांवर/कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही,
याची दक्षता घ्यावी. तसेच, पुढील प्रत्येक वर्षी माहे सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणित संचमान्यता पूर्ण करुन सदर संचमान्यतेनुसार अनुदानास पात्र ठरत असलेल्या शाळा/तुकड्यांवरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबतचा प्रस्ताव (आर्थिक भारासह) या कार्यालयास सादर करावा.
अनुदान मंजूरीबाबतची कार्यवाही शीघ्रतेने होणेबाबत कार्यवाही अपेक्षित आहे. ही बाब विचारात घेता अनुदान मंजूरीबाबत शासनाने संदर्भीय पत्रान्वये दिलेल्या कालमर्यादेचे कटाक्षाने पालन करावे. कोणत्याही परिस्थितीत शासनाने दिलेल्या कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
संपत सुर्यवंशी
शिक्षण संचालक
माध्यमिक व उच्च माध्यमिक
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments