दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी माननीय मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली अधिकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित बैठकीमध्ये कोणकोणत्या गोष्टी वर चर्चा झाली व कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या याबाबत सविस्तर इतिवृत्त सामान्य प्रशासन विभागाने पुढील प्रमाणे परिपत्रकान्वये प्रसिद्ध केले आहे.
राज्य सरकारी अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दिनांक ०६.११.२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता मा.मुख्य सचिव यांचे समिती कक्ष येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त पुढील आवश्यक त्या कार्यवाहीस्तव सोबत जोडण्यात येत आहे.
आपली
(पल्लवी भ. पालांडे)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग/१६-अ
राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिनांक ०६.११.२०२३ रोजी मा. मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयीन दालनात अपर मुख्य सचिव (सेवा), अपर मुख्य सचिव (वित्त) व सचिव (साविस) यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत खालील विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांकडे महत्वाच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक प्रस्तावित करण्यात येईल, असे बैठकीत नमूद करण्यात आले. तसेच बैठकीच्या शेवटी मा. मुख्य सचिव यांनी सर्व संघटनांच्या अधिकारी / पदाधिकाऱ्यांना आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संप / आंदोलन न करण्याची विनंती केली. पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात संघटनेच्या सर्व सदस्यांशी विचारविनिमय करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments