शालेय परिसर व शाळा इमारतीमध्ये अनधिकृत प्रवेश व चित्रीकरण पूर्वपरवानगीशिवाय केल्यास कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात. CEO आदेश.

 सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शालेय परिसर व शाळा इमारतीमध्ये प्रवेशाबाबत दिनांक 25 ऑक्टोबर २०२३ रोजी परिपत्रक निर्गमित करून अनधिकृत व्यक्तीने शाळेत प्रवेश केल्यास त्याचे वर कारवाही करणेबाबत पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहे. 

काही शाळांमध्ये शालेय कामकाजाशी संबंधित नसणाऱ्या व्यक्ती विनापरवाना शाळेत येऊन शालेय कामकाजामध्ये हस्तक्षेप करणे, विद्याथ्यांचे चित्रीकरण करणे त्याचा वापर शाळांच्या अपप्रचारासाठी करणे, त्या आधारे शालेय व्यवस्थापनास धमकावणे इ. बाबी करताना दिसून आले आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस व शैक्षणिक वातावरणास बाधा पोहोचवणारी आहे.


बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ (POCSO) च्या कायदयातील कलम २३(१) नुसार "कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारचे प्रसार माध्यम, स्टुडिओ किंवा फोटोग्राफी सुविधांच्या माध्यमातून कोणतीही परिपूर्ण किंवा प्रमाणीकृत माहितीशिवाय कोणत्याही बालकासंबंधी कोणताही अहवाल देणार नाही किंवा कोणतीही टिप्पणी करणार नाही ज्यायोगे बालकाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल किंवा त्याच्या गोपनीयतेचे उल्लंघन होवू शकते" अशी कायद्यात तरतूद आहे.


भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५३ नुसार " लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हगला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे. " हा गुन्हा आहे.


या दृष्टीने या परिपत्रकाव्दारे जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शालेय आवारात विद्यार्थी, पालक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय पर्यवेक्षीय यंत्रणा यांचे व्यतिरिक्त अन्य कोणासही शाळेमध्ये किंवा शालेय आवारात प्रवेश करण्यास वा चित्रीकरण करण्यास संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांचे पूर्वपरवानगीशिवाय अन्य व्यक्तीस मान्यता देता येणार नाही.


तृप्ती धोडमिसे भा.प्र.से.

मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद सांगली.



वरील परिपत्रक जरी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी निर्गमित केले असले तरी त्यामध्ये संदर्भित POCSO 2012 कायदा व  भारतीय दंड संहिता 1860 कलम 353 हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.