दिनांक: २५ ऑक्टोबर, २०२३ महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 25 ऑक्टोबर 2019 रोजी शिक्षण संचालक प्राथमिक यांना पदवीधर प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतनोन्नती साठी TET अट शिथिल करणे संदर्भात पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
प्रति,
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय:
पदविधर प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतनोन्नतीबाबत.
महोदय,
उक्त विषयाबाबतच्या आपण संदर्भाधीन पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून आपणास कळवण्यात येते की,
पदविधर प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतनोन्नती, देण्यात येणान्या शिक्षकांची नियुक्ती दि.१३.०२.२०१३ पूर्वीची असल्यास सदरची तोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ची अट शिथिल करण्याबाबतची आपली धारणा पक्की करण्यात येत आहे. परंतु अशा शिक्षकांना पदोन्नती देताना राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेने त्या पदाकरीता विहीत शैक्षणिक व व्यावसायीक अहर्ता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) वगळता पूर्ण केलेली असणे बंधनकारक असून, याचे पालन होईल याबाबतची दक्षता आपल्या स्तरावरून घेण्यात यावी ही विनंती..
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments