महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११ ००४.
विषय- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी)
वर्ग दहावी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 वेळापत्रक पीडीएफ डाउनलोड
वर्ग बारावी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 वेळापत्रक पीडीएफ डाउनलोड.
फेब्रु-मार्च २०२५ लेखी परीक्षा आयोजनाबाबत...
। । प्रकटन । ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई. कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जातात. सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो.
त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इ.१२वी व इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा १८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजित आहे.
लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम
मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२५ ते मंगळवार, दि. १८ मार्च २०२५
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत
शुकवार, दि. २४ जानेवारी २०२५ ते सोमवार, १० फेब्रुवारी २०२५
मूल्यमापन
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा
शुकवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२५ ते सोमवार दि. १७ मार्च, २०२५
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन
सोमवार, ०३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार, २० फेब्रुवारी २०२५
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या वरीलप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
सदर तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या शुक्रवार, दि.२३.०८.२०२४ पर्यंत secretary.stateboard@gmail.com या संकेत स्थळावर पाठवाव्यात. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही.
उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
दिनांक : १२.०८.२०२४
(अनुराधा ओक)
सचिव,
राज्यमंडळ, पुणे ४.
वर्ग दहावा वर्ग बारावा 2024 वेळापत्रक
नमस्कार मित्रांनो, वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तर 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर 1 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 या कालवधीत दहावीची लेखी परीक्षा होणार आहेत.
28 ऑगस्ट 2023 रोजी परिपत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संपूर्ण राज्याभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या एकूण नऊ विभागीय मंडळाकडून दहावी व बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ssc hsc timetable
बोर्डाच्या फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे हे संभाव्य वेळापत्रक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना व तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असं बोल जात आहे.
प्रचलित पद्धतीनुसार दहावी आणि बारावीच्या ह्या लेखी परीक्षा आयोजित करण्यात येतील याची सर्व शाळा, महावियालये, विद्यार्थी व तसेच पालकांनीही नोंद घ्यावी असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे.
वेळापत्रकाची देण्यात आलेली मंडळाच्या संकेतस्थळावरील सुविधा ही फक्त सर्वांच्या माहितीसाठी असून, परीक्षेपूर्वी सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, व तसेच कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे परीक्षेचे वेळापत्रक हे अंतिम ग्राह्य धरण्यात येईल असे मंडळाकडून सांगण्यात आलेले आहे.
10 वी आणि 12 वी वेळापत्रक :- वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक कर
⬇️
बारावीचे संपूर्ण वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
२)
SSC
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा
शुक्रवार दि. ०१ मार्च २०२४ ते
शुक्रवार दि. २२ मार्च २०२४
दहावीचे संपूर्ण वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
परीक्षेच्या तारखांची खात्री मंडळाकडून देण्यात आलेल्या छापील वेळापत्रकावरून करून संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी,अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आलेली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने इतर संकेतस्थळ, अन्य यंत्रणांवरील छापील वेळापत्रक किंवा social media च्या माध्यमातून व्हायरल होणारे दहावी व बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक ग्राही धरू नये अशा प्रकारच्या सूचनाही या परिपत्रकातुन करण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वेळोवेळी कळविण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
अधिक महितीसाठी www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments