शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ७ वा वेतन आयोग 2 रा हप्ता माहे ऑक्टोबर 23 च्या वेतनासोबत अदा करणेबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक यवतमाळ यांनी दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षकांचे ७ वा वेतन आयोग फरक २ रा हप्ता अदा करणेकरिता अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यानुंगाने आपणास सुचित करण्यात येते को, आपल्या अस्थापनेवरील सेवानिवृत्त शिक्षक आणि राष्ट्रिय निव्रुत्तीवेतन योजना (NPS) लागु असलेल्या सर्व शिक्षकांचे ७ वा वेतन आयोग फरक १ला व २ रा अदा करण्यासाठी यापुर्वीच अनुदान उपलब्ध करुण देन्यात आले आहे.
उपरोक्त संदर्भिय आदेशान्वये यवतमाळ जिल्यातील केवळ भविष्य निर्वाह निधी (GPF) योजना लागु असलेल्या कार्यरत शिक्षक यांचे ७ वा वेतन आयोग फरक २ रा हप्ता हा शालार्थ प्रणाली अंतर्गत माहे ऑक्टोबर २०२३ चे देयकासोबत अदा करावयाचा असल्याने याबाबतच्या नोंदी शालार्थ प्रणाली अंतर्गत उपलब्ध टॅब मधून अद्यावत करण्यात याव्यात. शालार्थ प्रणालीमध्ये नोंद करतांना केवळ फरकाचे विवरण पत्रावरूनच करण्यात यावी. असे कळविण्यात आले होते.
तरीसुद्धा आंतरजिल्हा बदली होऊन आलेल्या शिक्षक यांचा 2 रा हप्ता अदा करण्याचा राहण्याची शक्यता असल्याने ज्या शिक्षक यांचा 2 रा हप्ता शालार्थ प्रणाली मध्ये अदा करायचा असेल त्यांची अ.क्र. नाव रक्कम व हप्ता प्रलंबित राहण्याची कारणे या नमुन्यात मागणी दि 9 ऑक्टोबर 23 ला सादर करावी, अनुदान उपलब्ध न झाल्यास NPS धारक शिक्षक यांचा 2 हप्ता अदा केलेले बिल रिजेक्ट करण्याच्या अटीवर शालार्थ प्रणाली अंतर्गत राहिलेल्या शिक्षकांना 2. रा हप्ता अदा करण्यात यावा.
यानंतर कोणत्याही परिस्थितीत ७ वा वेतन आयोग फरक १ला व २ रा हमा करिता अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार नाही. याची गांभीर्याने नोंद घ्यावी. यानंतर आपले पंचायत समिती / शाळेवरील शिक्षक यांचा फरक प्रलंबीत राहोल्यास त्याबाबतची संपुर्ण जवाबदारी आपली राहील. एकाही शिक्षकांना ७ वा वेतन आयोग फरकाचा १ला / २ रा हप्ता यापूर्वी अदा करण्यात आल्यानंतरसुद्धा दुबार अदा होत आहे, अशी बाब जिल्हा कार्यालयाचे निदर्शनास आल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता आर्थिक अनियमितता केल्याबाबतची संबंधीत मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांचे विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येईल. त्यामुळे यापुर्वी फरक अदाकरण्यात आलेला नसल्या बाबत मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी स्वतः खात्री करावी.
शिक्षणाधिकारी(प्राथमिक) जिल्हा परिषद, यवतमाळ
वरील पत्र जरी जिल्हा परिषद यवतमाळचे असले तरी सदर पत्रातील संदर्भ शिक्षण उपसंचालक यांचे पत्र शिक्षण संचालक कार्यालय यानुसार निर्गमित केले आहे त्यामुळे शिक्षण संचालक कार्यालयातील आदेश संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असेल.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments