समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सम्रग शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमातील विशेष शिक्षकांना (प्राथमिक स्तर) सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात रु.२१,५००/- प्रतिमाह इतके मानधन मंजूर होते. तथापि, समग्र शिक्षाच्या सुधारित आराखड्यानुसार या विशेष शिक्षकांचे मानधन सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून रु.२०,०००/- प्रतिमाह च्या मर्यादेत निश्चित करण्यात आलेले होते. त्यानुसार, सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून विशेष शिक्षकांना रु. १५००/- प्रतिमाह इतके मानधन कमी मिळत होते. यास्तव सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून रु.१५००/- प्रतिमाह इतकी फरकाची रक्कम राज्य निधीमधून देण्याचा व यासाठी एकूण रु. ३५०.२८ लक्ष इतका निधी दरवर्षी राज्य हिश्याच्या प्रमाणाबाहेर उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव मा. मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात आला असता, मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२२-२३ या कालावधीसाठी समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या मानधनातील फरकाची रक्कम रु. ३,१९,५०,०००/- इतक्या निधीची मागणी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी त्यांच्या संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये केली होती. तथापि, आर्थिक वर्ष २०२२-२३ संपल्याने पुढील कार्यवाही हाऊ शकली नाही. सद्यस्थितीत सन २०२२-२३ व सन २०२३ २४ या दोन वर्षांच्या एकत्रित मानधनापोटी एकूण रु. ६,३९,००,०००/- इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी त्यांच्या संदर्भ क्र. ४ येथील पत्रान्वये केली आहे. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी त्यांच्या संदर्भ क्र. ४ यांची विनंती विचारात घेता, समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमातील एकूण १,७७५ विशेष शिक्षकांच्या सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या दोन वर्षांच्या रु. ६,३९,००,०००/- इतका निधी उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती..
शासन निर्णय:-
समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमातील एकूण १,७७५ विशेष शिक्षकांच्या मानधनातील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी अवितरीत निधीमधून रु. ६,३९,००,०००/- इतका निधी (रुपये सहा कोटी एकोणचाळीस लाख फक्त) इतका निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना वितरीत करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर निधी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात "मागणी क्रमांक ई-२, १०६, शिक्षक आणि इतर सेवा, (००) (००) (०१) समग्र शिक्षा अभियान, (सर्वसाधारण) (राज्य हिस्सा ४० टक्के), ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) (२२०२ आय ६१२) या लेखाशिर्षाखाली अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या निधीतून यावर होणारा खर्च भागविण्यात यावा.
३. सदर निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नीरोड, मुंबई यांचेकडे सुपूर्द करण्यात येत आहे. सदर निधी आहरीत करून वितरीत करण्यासाठी अवर सचिव/ कक्ष अधिकारी (रोख शाखा / लेखा शाखा), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना "आहरण व संवितरण अधिकारी" तर सह सचिव / उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना "नियंत्रक अधिकारी" म्हणून घोषित करण्यात येत आहे. संबंधीत आहरण व संवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहरित करून निधी समग्र शिक्षा यांच्या बँक खात्यात जमा करावा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी सदर निधी शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांना हस्तांतरीत करावा.
६. वित्त विभाग, शासन परिपत्रक दिनांक १२.०४.२०२३ मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे. सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरिताच्या अटी व शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत.
७. सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र. २७६/१४७१, दि.१६.०८.२०२३ व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र. ८२२/ व्यय-५, दि. ३०.०८.२०२३ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१०१११२२७४८४७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
( इ.मु. काझी) सह सचिव, महाराष्ट्र शासन
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments