महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी नवीन शासन आदेश निर्गमित करून पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतुदी सुधारित करणे/ वगळणे व नवीन तरतूदी समाविष्ट करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.
शिक्षण सेवकाची भरती "शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी" यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये पारदर्शक पध्दती विहीत करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात, पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्यपध्दतीमध्ये बदल / सुधारणा करणे व काही तरतूदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने, उक्त संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये दि.०७.०२.२०१९ च्या शासन निर्णयामधील काही तरतूदी वगळण्यात येऊन नव्याने तरतूदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तसेच सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यानुषंगाने इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना करावयाच्या अध्यापनाच्या दर्जामध्ये गुणात्मक सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये चालू करण्यात आलेल्या परंतु विद्यार्थ्यांच्या उपस्थिती अभावी बंद पडण्याची शक्यता असलेल्या मराठी व सेमी इंग्रजी शाळा निरंतर सुरु राहतील यास्तव केंद्रांतर्गत असणाऱ्या शिक्षकाचे इंग्रजीमधून अध्यापनाबाबतचे तंत्र विकसित करण्याकरीता केंद्रस्तरावर साधन व्यक्ती म्हणून नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. या सर्व बाबींचा विचार करता अभियोग्यता धारक व्यक्तीने निवडीकरीता करावयाची शिफारस, केंद्रांतर्गत शिक्षकांना इंग्रजी विषयातून अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्याकरीता केंद्रस्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवड करुन त्यांचे निवडीचे निकष निश्चित करणे, तसेच दोन विषयाच्या कार्यभाराबाबत अर्हता निश्चित करणे व अर्धवेळ शिक्षकांची पवित्र प्रणालीमार्फत निवड करणेबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय करण्यात येत आहे.
शासन निर्णय-
पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व अर्हता तसेच इंग्रजी विषयातून अध्यापनाकरीता केंद्रस्तरावर साधन व्यक्तीची निवड व निकष याअनुषंगाने पुढीलप्रमाणे तरतूदी सुधारित करण्यास व नव्याने समाविष्ट करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे ०२. उक्त वाचा येथील क्र. २ येथील शासन निर्णय दिनांक १०.११.२०२२ मधील अ.क्र.५ येथील विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील या तरतूदी ऐवजी,
" विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. उमेदवारास पुर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असे समाविष्ट करण्यात येत आहे.
०३. उच्च माध्यमिक (इ. ११ वी ते इ. १२ वी ) या विभागाकडील दोन विषयाचा मान्य कार्यभार विचारात घेऊन पूर्ण वेळ मान्य रिक्त पदांवर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युतर पदवीची मूळ अर्हता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील. सदर पदे पवित्र पोर्टलमार्फत भरण्यात येतील. ०४. उच्च माध्यमिक (इ. ११ वी ते इ. १२ वी) या गटातील संच मान्यतेत मूळ मंजूर पैकी रिक्त असलेली अर्धवेक पदे (तासिका तत्वावरील बगळून) पवित्र या प्रणालीमार्फत पद भरती करण्यात येईल. ०५. जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळास्तरावर केंद्रातर्गत अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकविण्याकरीता खालील निकषांनुसार शिक्षक पदावर निवड झालेले उमेदवार केंद्र शाळांतर्गत शाळांसाठी साधन व्यक्ती म्हणून काम करेल. सदरची नियुक्ती जिल्हा परिषदेकडील उपलब्ध रिक्त पदांमधुन होईल.
सदरची निवड करताना पुढील निकष / प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावेत:-
५. पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार(शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण
२. पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार.
३. इ. १२ वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार.
४. ३. ५० वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार.
५. पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार
०६. उक्तप्रमाणे नमूद निकषांस अनुसरून निवड झालेल्या उमेदवारांना साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी त्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एक परीक्षा घ्यावी व यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. यासंदर्भात आयुक्त (शिक्षण) यांनी या प्रक्रियेचा आराखडा निश्चित करुन या योजनेची अंमलबजावणी करावी.
०७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१०१३१९३६२८०४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरी साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(तुषार महाजन) उपसचिव, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments