सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ तसेच दिनांक 12 ऑक्टोबर 2019 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पुढील प्रमाणे शासन निर्णय केला आहे.
प्रस्तावना:- केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते ८ वी च्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीची सर्व मुले आणि दारिद्रयरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाच्या सदर योजनेपासून वंचित राहत असलेल्या दारिद्रयरेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यासाठी तसेच, मोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ देण्यासाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
नियोजन व वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार "मोफत गणवेश, बुट व पायमोजें" राज्यस्तरीय योजनेकरिता खालील प्रमाणे नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजूरी देण्यात येत आहे.
मागणी क्रमांक ई- २
२२०२, सर्वसाधारण शिक्षण
०१ प्राथमिक शिक्षण
१०३ - प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य
(०१) प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य
(०१) (२०) मोफत गणवेश, बुट व पायमोजे योजना (राज्यस्तरीय योजना)
(२२०२८३८)
सदर शासन निर्णय प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ सं.सं : ख. वि. / चा-१/ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग / यूओआर-६६/२०२३-२४/५५५, दिनांक १६/०८/२०२३ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेने तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ७१५/व्यय-५, दिनांक १७ जुलै २०२३ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३१०१२१७२७४५४३२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(गोविंद कांबळे )
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments