SSC Extra Marks Updates - शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की, शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणान्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतच्या कार्यपध्दतीबाबत शासनाने शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/एसडी-२, दि ०७/०१/२०१७ निर्गमित केलेला आहे. शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या १० वीच्या विद्याथ्यांना मार्च २०१८ च्या वाढीव सवलतीचे गुण देण्यात येईल' असे त्यामध्ये नमूद केलेले होते.


तदनंतर शासनाने शुध्दीपत्र क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२०२/एसडी-२, दिनांक १४/०३/२०१७ निर्गमित केलेले असून त्यामध्ये शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मार्च २०१८ पासून होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेऐवजी 'शैक्षणिक वर्ष सन २०१६-१७ पासून कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्च २०१७ पासून होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेमध्ये पुढीलप्रमाणे वाढीव गुणांची सवलत देण्यात यावी' असे निर्देश दिले आहेत.


तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र. २०२/एस.डी.२ दिनांक दि.१६ मार्च २०१७ मध्ये नमूद केल्यानुसार ज्या संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात येणार आहेत त्या संस्थांची निवड करण्याची जबाबदारी सांस्कृतिक कार्य विभागाकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, यांनी क्र. संकीर्ण- ८२१७/प्र.क्र.४९/सां.का.४, दि ०१/०३/२०१७ अन्वये मार्च २०१७ पासून होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये (इ.१०वी) वाढीव गुणांची सवलत देण्याकरिता शास्त्रीय गायन, नृत्य व बादन या क्षेत्रातील १९ संस्था व लोककला प्रकारातील २९ संस्थांची यादी प्रसिध्द केली आहे. उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय दि.७/१/२०१७, दि.१/३/२०१७, शासन शुध्दीपत्र दि.१४/३/२०१७ व शासन पत्र दि. १६/३/२०१७ सर्व विभागीय मंडळांना राज्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून देऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.


याबाबतची कार्यपध्दती खालीलप्रमाणे आहे.


१) सदर कला सवलत फक्त नियमित, खाजगी नियमित विद्यार्थी यांना देण्यात येणार आहे. पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ठ होणारे विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणारे विद्यार्थी यांना लागू राहणार नाही. कला सवलतीचे गुण संबंधित विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास उत्तीर्ण होण्यास जितके गुण कमी पडत असतील तितके गुण अनुज्ञेय असलेल्या गुणविभागणीप्रमाणे एक किंवा सर्व विषयात कमाल मयदित विभागून देण्यात येवून उर्वरित शिल्लक गुण संबंधित विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांमध्ये / टक्केवारीमध्ये जमा करण्यात येणार आहेत. 


उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अनुज्ञेय असलेले गुण एकूण गुणामध्ये स्वतंत्रपणे क्रीडा गुणांच्या प्रचलित पध्दतीनुसार दर्शविण्यात येणार आहेत. कला सवलतीचे गुण दिल्यास गुणांची टक्केवारी सरासरी १०० टक्के पेक्षा जास्त होणार नाहीं.

कला सवलतीचे गुण कोणत्याही पारितोषिकासाठी ग्राहय धरले जाणार नाहीत.


६) विद्यार्थ्यांनी उपरोक्त नमूद शासन निर्णय / शासन शुध्दीपत्रकाच्या अनुषंगाने मार्च २०१७ साठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) साठी प्रविष्ठ झालेल्या व शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या व लोककला प्रकारात सहभागी झालेल्या संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज आवश्यक त्या संस्थेच्या प्रमाणपत्रासह शाळेच्या मुख्याध्यापकांकडे दिनांक २०/०४/२०१७ पर्यंत विहित नमून्यात सादर करावेत.


तसेच संबंधित शाळोच्या मुख्याध्यापकांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक ०१/०३/२०१७ रोजीच्या शासननिर्णयातील संस्थांकडील संबंधित विद्यार्थ्यार्थ्यांचे प्रमाणपत्र प्रमाणित करून दिनांक ०७/०१/२०१७ रोजीच्या शासननिर्णयामध्ये नमूद केलेल्या कलाप्रकाराच्या प्राविण्यानुसार अनुज्ञेय होणाऱ्या गुणांच्या शिफारशीसह संबंधित विभागीय मंडळाकडे शाळेच्या लेटरहेडवर प्रस्ताव सादर करावेत, ज्या विद्यार्थ्यांना या गुण द्यावयाचे आहेत त्या विद्यार्थ्यांची यादी, विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे प्रमाणित करून तसेच किती गुण द्यावेत याची शिफारस करून, मान्यताप्राप्त संस्थांची यादी त्यासोबत सादर करावी.


८) ९) या संदर्भात मुख्याध्यापकांनी त्यांचेकडील सर्व प्रस्ताव दिनांक ३०/०४/२०१७ पर्यंत विहित नमून्यातील अर्जासोबत संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करावेत, विद्यार्थ्यांनी दिनांक २०/४/२०१७ पर्यंत व शाळांनी दि.३०/४/२०१७ पर्यंत प्रस्ताव सादर असले तरी काही कारणाने विद्यार्थ्यांनी उशीरा प्रमाणपत्र सादर केल्यास, शाळांनी फक्त या वर्षापुरतेच त्यांचे प्रस्ताव संबंधित विभागीय मंडळाकडे सादर करावेत.


१०) एखादा विद्यार्थी एकापेक्षा जास्त संस्थामध्ये कला विषयक व विषयक शिक्षण घेत असल्यास व एकापेक्षा जास्त कला अथवा क्रीडा विषयांमध्ये प्राविण्य प्राप्त करीत असला तरी त्यास सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याची कमाल मर्यादा २५ असेल. तरी मार्च २०१७ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) साठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व माध्यमिक शाळा तसेच शासन निर्णय ०१/०३/२०१७ मध्ये नमूद शास्त्रीय कला, लोककला प्रकारात काम करणाऱ्या संस्था यांनी उपरोक्त नमूद शासन निर्णयांची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी. कोणताही विद्यार्थी सदर गुणांच्या सवलतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.


दिनांक ३१/०३/२०१७

 (कृष्णकुमार पाटील)

सचिव

राज्यमंडळ, पुणे-०४


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा. 


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.