Scholarship Update - दक्षणा JEE आणि NEET निवासी स्कॉलरशिप २०२४ बाबत SCERT चे पत्र.. निवड चाचणीत पात्र ठरल्यावर मिळणार पुणे येथे विनामूल्य प्रशिक्षण व निवास भोजन व्यवस्था

बारावी विज्ञान शाखेत शाखेत शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची स्कॉलरशिप योजना! 


दक्षणा संस्था, पुणे ही सेवाभावी शिक्षण संस्था असून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य JEE आणि NEET विषयी निवासी स्कॉलरशिप व Indian Institute of (IIT), National Institute of Technology (NIT) All India Institute of Medical Science (AIIMS) किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रशिक्षण विषयक काम करीत आहे. दरवर्षी किमान ६०० विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते. आणि साधारणतः ८०% विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. दक्षणा या संस्थेने आतापर्यंत ७२००+ विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिलेल्या आहेत. दक्षणा एक वर्षाच्या विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्तीमध्ये दक्षणा व्हॅली पुणे येथे विनामूल्य प्रशिक्षण, भोजन व निवास व्यवस्था करण्यात येते.


संदर्भ क्र. १ अन्वये, दक्षणा संस्था, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या दक्षणा एक वर्षाच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे निकष खालीलप्रमाणे आहेत. विद्यार्थ्यांची निवड चाचणीद्वारे केली जाते.


• सरकारी किंवा अनुदानित शाळेत २०२३-२४ या वर्षात इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेचे विद्यार्थी Joint Dakshana Selection Test (JDST) २०२४ साठी पात्र आहेत. इयत्ता दहावीला विज्ञान व गणित विषयामध्ये आवश्यक गुण पुढीलप्रमाणे आहे. GENEWS/OBC: 85%, SC:70%, ST:60%,PD: No Cut off तसेच ज्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २ लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र आहेत.


JDST (Joint Dakshana Selection Test) २०२४ नोंदणी प्रकिया:


पात्र विद्यार्थी http://apply.scholarship.dakshana.org/ दि.३१/१०/२०२३ पर्यंत येथे नोंदणी करू शकतात

• नोंदणी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक लिंक मिळेल आणि ३० मिनिटांच्या अभियोग्यता चाचणीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी ईमेल मिळेल.

पात्र विद्यार्थ्यांना JDST- २०२४ परीक्षेसाठी बोलावले जाईल आणि डिसेंबर २०२३ पूर्वी त्यांच्याशी संस्थेकडून संपर्क केला जाईल.


अधिक माहितीसाठी http://www.dakhana.org/jdst_ वेबसाईटवर भेट द्यावी किंवा +९१७७९८७८६४०५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.


• JDST परीक्षा जानेवारी २०२४ मध्ये आपल्या राज्यातील / जिल्ह्यातील नियुक्त ठिकाणी घेण्यात येईल.


दक्षणा निवासी शिष्यवृत्तीअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा या दृष्टीने पात्र, गरजू आणि इच्छुक विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्याबाबत आपल्या स्तरावरून पुढील कार्यवाही करण्यात यावी.


(डॉ. कमलादेवी आवटे)

उपसंचालक (समन्वय विभाग), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ३०



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.