जिल्हा परिषद शाळा (लोकल बॉडी) संचमान्यता दुरुस्तीबाबत शिक्षण संचालकांचे दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजीचे निर्देश पुढील प्रमाणे.
राज्यातून जिल्हा परिषद, मनपा (लोकल बॉडी) क्षेत्रातील जिल्हा परिषद व महानगर पालिका शाळांच्या संचमान्यता दुरुस्तीसाठी प्रस्ताव प्राप्त होत आहेत..
यामध्ये प्रामुख्याने पटसंख्या कमी-जास्त असणे, पटसंख्या असूनही शिक्षकांची संख्या पटसंख्येवर आधारीत दिसत नाही, तसेच पटसंख्या व खोलीच्या संख्या पर्याप्त असतानाही शिक्षक त्या त्या प्रमाणात मंजूर न झाल्याचे प्रस्तावामध्ये नमूद केलेले आहे. विद्यार्थी संख्या पुरेशी असूनही विद्यार्थीसंख्या 01 (एक) किंवा 00 (शून्य) असणे, संच मान्यतामध्ये कमी वा शिक्षक पदे दिसत नाहीत.
सदरच्या बाबी या तांत्रिक स्वरुपाच्या असल्याने या प्रकरणी आपल्या स्तरावरुन पडताळून योग्य विद्यार्थी संख्येची माहिती संच मान्यता प्रणाली उपलब्ध करुन द्यावी व संचमान्यता प्रणालीमध्ये आवश्यक त्या बाबी पूर्ण करुन संचालनालयास अवगत करावे. त्यानंतर संचालयास्तरावरुन संच मान्यता जनरेट करण्याची आवश्यक ती कार्यवाही करणे शक्य होईल.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर
प्रत पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी 1. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
2. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद (सर्व)
2/- उक्त बाबीसंदर्भात एनआयसी पुणे यांना दुरुस्तीबाबत निर्देश दिलेले आहेत. ज्या शाळांच्या संचमान्यता सुधारी करणे आवश्यक आहे अशा सुधारीत संचमान्यता दुरुस्ती होईपर्यंत लोकल बॉडी अंतर्गत असलेल्या त्या शाळांबाबत शिक्षकांच्या समायोजन तूर्त करु नये.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments