‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’चा (आभा) एक भाग म्हणून केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व नागरिकांनी आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. कार्डवर रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचार आदी माहिती साठविली जाणार आहे.
आपले आधार कार्ड आपण आपल्या मोबाईलवरून सहजपणे काढू शकतो. यासाठी आपल्याकडे असणे आवश्यक आहे आपले आधार कार्ड व त्याशी संलग्न असलेला मोबाईल नंबर.
आभा कार्ड काढण्यासाठी आपल्या मोबाईल मधील गुगल ओपन करून त्यामध्ये पुढील प्रमाणे आभा कार्ड असे इंग्रजीतून सर्च करा व सर्च केल्यानंतर सर्च लिस्ट मधून पहिल्याच लिंक वर क्लिक करा!
पहिल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये क्रिएट युवर आभा नंबर युजिंग आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन असे दोन पर्याय मिळतील आपल्याकडे आधार कार्ड उपलब्ध असते त्यामुळे युसिंग आधार कार्ड वर टिक करावे नसेल तर युजिंग ड्रायव्हिंग लायसन वर क्लिक करावे.
व शेवटी दिलेल्या काळ्या रंगाच्या नेक्स्ट बटन वर क्लिक करावे.
त्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्या विंडोमध्ये आपला आधार नंबर किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चा नंबर अचूक नोंदवावा त्याखाली असलेल्या सूचनानंतर आय ॲग्री वर टिक करावे कॅपच्या कोड मध्ये असलेल्या अंकांची बेरीज करून त्याखाली नोंदवावी व त्याखाली असलेल्या काळ्या रंगाच्या नेक्स्ट बटन वर क्लिक करावे.
वरील नेक्स्ट बटन वर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड सोबत संलग्न असलेल्या मोबाईल नंबर वर सहा अंकी ओटीपी येईल तो अचूक सहा डब्यांमध्ये नोंदवावा व नेक्स्ट बटन वर क्लिक करावे अचूक ओटीपी नोंदवल्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्ड वरील माहिती पुढील प्रमाणे दिसून येते. ज्यामध्ये आपले नाव जन्मतारीख व पत्ता आपल्याला दिसतो त्या खालील काळ्या रंगाच्या नेक्स्ट बटन वर क्लिक करावे.
मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा..
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments