वरिष्ठ / निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र दुरुस्ती लिंक उपलब्ध करणेबाबत लोकप्रतिनिधी मार्फत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र कडे विचारणा झाली असता त्यांना दिनांक 15 सप्टेंबर २०२३ च्या पत्रानुसार पुढील प्रमाणे उत्तर देण्यात आले आहे.
आपण वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्राप्तीनंतर शिक्षकांकडून प्रमाणपत्रात स्वत:ची माहिती भरताना काही चुका झाल्याने त्या दुरुस्त करणेकामी विनंती केली आहे. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येत आहे की, या बाबत प्रस्तुत कार्यालयात सविस्तर चर्चा झाली असून पुढील काही दिवसांत प्रशिक्षनार्थ्याना सदर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र भरताना त्यांचेकडून झालेल्या स्वत:चे नाव, शाळेचे नाव, तालुका व जिल्हा यात दुरुस्ती करण्यासाठी दुरुस्ती लिंक खुली करून देण्यात येणार आहे.
(डॉ. नेहा बेलसरे)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments