सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील शाळा, विद्यार्थी व शिक्षक या तीनही पोर्टलवरती शाळांची माहिती अंतिम करणेबाबत MPSP चे निर्देश १६/०४/२०२५

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सन २०२४-२५ ची शाळा, विद्यार्थी व शिक्षक या तीनही पोर्टलमधील शाळांची माहिती तपासून अंतिम करणेबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


उपरोक्त संदर्भिय विषयान्वये सन २०२४-२५ या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये दि. ३० एप्रिल, २०२५ पर्यंत अंतिम करून राज्याचे प्रमाणपत्र यु-डायस प्लस प्रणालीवर अपलोड करण्याचे कळविले आहे.

NEP २०२० नुसार Gross Enrolment Ratio १००% असण्याच्या अनुषंगाने नियमित शाळा व या शाळांमधील पूर्व प्राथमिक वर्गासोबतच, नोंदणी नसलेल्या अनौपचारिक पूर्व प्राथमिक केंद्र/शाळा, अनाधिकृत शाळा, यु-डायस क्रमांक प्राप्त नसलेल्या शाळा व कौशल्य केंद्रे इ. मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचीही नोंदणी यु-डायस प्लस प्रणालीमध्ये होणे अत्यंत आवश्यक आहे. सबब, नोंदणी नसलेल्या अनौपचारिक पूर्व प्राथमिक केंद्र/शाळा, अनाधिकृत शाळा, यु-डायस क्रमांक प्राप्त नसलेल्या शाळा व कौशल्य केंद्रे इ. शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती तालुका लॉगिनमधून गटशिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी यांनी नोंदवून घेणे बंधनकारक आहे. याप्रमाणे सर्व नोंदी मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्णपणे संबंधित गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी/शिक्षणाधिकारी यांची राहील.

या सोबत शाळांच्या काही महत्वाच्या मुद्यांची माहिती अंतिम करतांना खालील मुद्ये काळजीपूर्वक तपासून घ्यावेत.

संगणकीय साहित्य शाळेमध्ये उपलब्ध असलेले संगणकीय साहित्य (संगणक, लॅपटॉप, सर्व्हर, प्रोजेक्टर, टॅबलेट, स्मार्ट टि.व्ही, स्मार्ट बोर्ड, प्रिंटर, मोबाईल फोन) विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरात असल्यास त्याच संगणकीय साहित्याची नोंद यु-डायस प्लस प्रणालीमध्ये करण्यात यावी, कार्यालयीन कामकाजासाठी उपलब्ध असलेल्या संगणकांची नोंद विद्यार्थ्यांसाठीचे साहित्य म्हणून करण्यात येवू नये.

संगणक प्रयोग शाळा: संगणक प्रयोगशाळांमध्ये किमान ५ संगणक उपलब्ध असणे आवश्यक आहे. सदर संगणक प्रयोग शाळेतील संगणक विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यापूर्वी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांमधून (सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, समग्र शिक्षा इत्यादी) शाळांना संगणक प्रयोग शाळा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा शाळांमधील संगणक प्रयोगशाळांचे ५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर संगणक प्रयोग शाळेचे हस्तांतरण शाळांना करण्यात आले आहे. या संगणक प्रयोगशाळेचे संचालन शाळा स्तरावरून करण्यात येते. तथापि, सदर संगणक साहित्य बंद असेल, वापरण्यास योग्य नसेल तर अशा साहित्याची शासन निर्णय दि. ०१ ऑगस्ट, २०११ नुसार निर्लेखनाची कार्यवाही करण्यात यावी व निर्लेखन कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सदर शाळेत प्रयोगशाळा नसल्याबाबतची नोंद यु-डायस प्लस प्रणालीमध्ये करावी.

इंटरनेट सुविधा: यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे किंवा कसे? याबाबतची माहिती विचारण्यात येते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये उपलब्ध असलेली इंटरनेट सुविधा लक्षात घेवून पुढील प्रमाणे नोंद करून माहिती तात्काळ अद्ययावत करावी, (1-Broadband/Leased Line, 2-USB Modem/dongle/Portable Hotspot, 3-Telephone line with modem, 4-Mobile phone Internet, 5-Any Other type of connection, 6-VSAT)

पिण्याच्या पाण्याची सुविधा यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळेमध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धताबाबत माहिती विचारण्यात येते. तरी भरण्यात आलेली माहिती पुढील मुद्यांच्या अनुषंगाने (Hand pumps/Bore well, Protected Well, Unprotected Well, Tap water, Packaged/Bottled Water, Others) भरण्यात आलेली आहे किंवा कसे? तपासून तात्काळ माहिती अद्ययावत करण्यात यावी. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होवू शकत नाही, अशा ठिकाणी स्वच्छ पेय पाण्याची/पिंपाची सुविधा उपलब्ध करून घ्यावी व त्याची नोंद इतर प्रकार (Other) मध्ये करण्यात यावी.

मुलां व मुलींकरिता स्वच्छतागृह शाळेमध्ये विद्यार्थी व विद्यार्थीनीकरिता नोंदविण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची संख्या तपासून जसे, मुलांकरिता, मुलींकरिता, दिव्यांग मुलामुर्लीकरिता, स्वतंत्रपणे उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांची संख्या यु-डायस प्रणालीमध्ये तात्काळ अचूक नोंदवावी.

विद्युत सुविधा : केंद्र शासनाकडून संगणक प्रयोगशाळा/स्मार्ट क्लासरूम यासारख्या सुविधा मंजूर करत असतांना विद्युत सुविधा उपलब्ध आहे, याची तपासणी केली जाते यामुळे विद्युत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करूनच तशी नोंद करावी.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी इतरही सर्वच मुद्यांची माहिती वस्तुनिष्ठ स्वरूपाची असल्याची पडताळणी करून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अंतिम करावी.

त्याअनुषंगाने दि. २८ एप्रिल, २०२५ पर्यंत सर्व गटशिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी यांनी तालुका/मनपा स्तरावरील सर्व शाळांची माहिती तपासून प्रमाणपत्र अपलोड करावे. तसेच सर्व शिक्षणाधिकारी यांनी तालुका व मनपा स्तरावरील माहिती तपासून. जिल्हास्तर प्रमाणपत्र अपलोड करावे. त्यानंतरच दि. ३० एप्रिल, २०२५ रोजी राज्यस्तर प्रमाणपत्र अपलोड करता येईल.


(संजय यादव, भा.प्र.से.)

 राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई.

वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिनांक 17 मार्च 2025 रोजी सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील शाळा, विद्यार्थी व शिक्षक या पोर्टलवरती शाळांची माहिती अंतिम करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


सन २०२४-२५ या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळांची माहिती यु-डायस प्रणालीमध्ये ऑनलाईन काम शाळास्तरावर माहे आगस्ट, २०२४ पासून सुरू आहे. दि. ०१/०४/२०२५ पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने सर्व शाळांची अचूक माहिती यु-डायस प्लस प्रणालीवर भरून अंतिम करणे आवश्यक आहे. याबाबत केंद्र शासनाकडून दि. २०/०३/२०२५ पर्यंत राज्यातील सर्व शाळांची माहिती अंतिम करून प्रमाणीत करण्यासाठी कळविले आहे. याच माहितीच्या आधारे सन २०२४-२५ PGI, वार्षिक नियोजन अंदाजपत्रकासाठी माहिती वापरण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्व शाळांची अचूक माहिती तपासून अंतिम करण्यासाठी आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. त्याचप्रमाणे जिल्हा व तालुका स्तरावरून सन २०२४-२५ ची माहिती दि. २५/०३/२०२५ पर्यंत अंतिम करून प्रमाणपत्राची प्रत या कार्यालयास ई-मेलद्वारे व यु-डायस प्लस पोर्टलवर अपलोड करण्यात यावी.


(सरोज जगताप)

 सहा. संचालक (कार्यक्रम) म.प्रा.शि.प., मुंबई.



📌Udise+  Teacher's Module


🔴 ज्या शिक्षकांची udise + Teacher Module मधील शिक्षकांचे नाव ,जन्मतारीख,प्रथम नेमणूक दिनांक चुकलेली असेल त्यामध्ये दुरुस्ती ची सुविधा BEO(MIS) लॉगिन Teacher Module ला सुरू झाली आहे कोणाची दुरुस्ती करायची असेल तर करून घेऊ शकता.



महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई च्या राज्य प्रकल्प संचालक यांनी दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी सन 2024-25 यु-डायस प्लस प्रणालीमध्ये भरण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणे बाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व व शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी महानगरपालिका मुंबई यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याचे काम शाळा स्तरावर सुरू आहे. यु-डायस प्लस पोर्टलवरील दि. २२/०८/२०२४ च्या अहवालानुसार राज्यातील २६,२३९ एवढ्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम बाकी आहे आणि यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शिक्षक व शाळांची माहिती भरणे बाकी आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरत असताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयामध्ये दि. ०६/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० या वेळात जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर व मनपाचे MIS-Coordinator यांची कार्यशाळा आयोजित केली आहे.

कार्यशाळेमध्ये पुढील मुद्यांवर आढावा घेण्यात येणार आहे -

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे Promotion चे काम पूर्ण करून घेणे, सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये Dropbox मध्ये असलेले विद्यार्थी शून्य करणे. राज्य अभ्यासक्रम, CBSE Board, IB Board या शाळांचे शाळानिहाय वर्गीकरण, शाळा सुरू शैक्षणिक वर्ष दिनांक, शाळा शैक्षणिक वर्ष बंद दिनांक, शाळेचे माध्यम याची जिल्ह्यांचे सर्व यादी सादर करणे.

शून्य विद्यार्थी, एक विद्यार्थी, दोन विद्यार्थी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची खात्री करणे,

शून्य शिक्षक, एक शिक्षक, दोन शिक्षक असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांचे आधार Validation पूर्ण करून घेणे.

Performance Grading Index (PGI) संबंधित यु-डायस प्लसमधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घेणे.

सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार Validation.

द्विव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती.

आयसीटी, डिजिटल लायब्ररी, शाळांमधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती.

विद्यार्थी, विद्यार्थीनीं व द्विव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्वच्छतागृहांची माहिती.

इयत्ता १०वी व १२वी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती.

मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिती.

व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती.

Library/Book Bank/Reding Corner, Sanitary Pad, Kitchen Garden, Rainwater Harvesting Facility, Drinking Water, Solar Panel इ. बाबतची माहिती.

शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती.

शाळा व्यवस्थापन समिती माहिती.

मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणांची माहिती.

तरी उपरोक्त कार्यशाळेसाठी संगणक प्रोग्रामर व MIS-Coordinator यांनी कार्यशाळेसाठी पूर्ण वेळ लॅपटॉपसह उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशित करावे.


(आर, विमला, मा.प्र.से.) 

राज्य प्रकल्प संचालक,

प्रत माहितीस्तव :

१) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.

२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.

संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये School, Student, Teacher Profile मध्ये शाळांची माहिती अद्ययावत करणेबाबत  दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईने १) विभागीय उपसंचालक, सर्व विभाग. २) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व. ३) शिक्षणाधिकारी (माध्यमिक व उच्च माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व. ४) शिक्षण निरीक्षक - उत्तर, दक्षिण व पश्चिम, मुंबई. ५) शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व. यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.



सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व

व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती अद्ययावत करणे सुरू आहे. समग्र शिक्षा, स्टार्स व PM SHRI या योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमधील माहितीच्या आधारे मान्यता देण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अचूक नोंदविणे आवश्यक आहे.

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार जिल्हा भंडारा, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, परभणी, सांगली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, बीड व वर्धा या जिल्ह्यांनी १००% विद्यार्थ्यांचे Promotion काम पूर्ण केल्याबदल या कार्यालयातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन। सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील १,४२,५४७ विद्यार्थ्यांचे Promotion ची माहिती यु-डायस प्रणालीमध्ये अद्यापपर्यंत नोंदविली नसल्याचे दिसून आले आहे. तरी सदर माहिती तात्काळ नोदवावी,

सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील ७,०५,६०६ विद्यार्थ्यांचे Dropbox मधून शाळांमध्ये Import करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे. तरी Dropbox मधील विद्यार्थी जिल्हानिहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे.

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०८/०८/२०२४ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील २७,२८,६५८ विद्यार्थ्यांचे Dropbox मधून शाळांमध्ये Import करून घेणे बाकी असल्याचे दिसून येत आहे. तरी Dropbox मधील विद्यार्थी जिल्हानिहाय शून्य करून घेणे आवश्यक आहे. जिल्हानिहाय Student Promotion Dropbox मधील विद्यार्थ्यांचा अहवाल आपणास माहितीसाठी सोबत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

इयत्ता १ली व इयत्ता ११वी मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांची माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी.

तसेच Performance Grading Index (PGI) संबंधित यु-डायस प्लसमधील खालील माहिती शाळांकडून अचूक नोंदवून घ्यावी.

सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आधार Validation.

द्विव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती.

आयसीटी, डिजिटल लायब्ररी, शाळांमधील संगणकीय साहित्य याबाबतची माहिती.

विद्यार्थी, विद्यार्थीनीं व द्विव्यांग विद्यार्थ्यांकरिता असलेल्या

स्वच्छतागृहांची माहिती.

इयत्ता १० वी व १२वी मधील विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती.

मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश उपलब्धतेची माहिती.

व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती.

Library/Book Bank/Reding Corner, Sanitary Pad, Kitchen Garden, Rainwater Harvesting Facility, Drinking Water, Solar Panel इ. बाबतची माहिती. शिक्षकांची व्यावसायिक व वैयक्तिक सर्व माहिती.

शाळा व्यवस्थापन समिती माहिती.

मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घेतलेल्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणांची माहिती.

तरी आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना दि. २५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीतील माहिती अद्ययावत करण्यासाठी

कळविण्यात यावे.


राज्य प्रकल्प संचालक,

म.प्रा.शि.प., मुंबई.

परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा. 

Download


 यु-डायस प्लस वर विद्यार्थी अपडेट करणे


       


   सविस्तर कृती



१. सर्वप्रथम https://udiseplus.gov.in या वेबसाईटवर जाणे. 

२. Student module

Select state:Maharahtra.. Go click

३. Login for student.... Click

४. Sign in karne

५. २०२४-२५ click

६. Left hand side ला पाच रेषा आहेत त्यावर क्लिक करणे

७. Progression activity... Click

८. Progression module..go click

९. Select class....click

१०. Select division... Click

११. विद्यार्थ्यांची नावे येथील

१२.Progression status... Select.. Click... Promoted click

१३. Percentage भरणे राऊंड फिगर मध्ये

१४. No of days साधारणता 220 च्या आसपास भरणे

१५. Schooling status... योग्य पर्याय निवडणे( इयत्ता दहावी साठी लेफ्ट स्कूल विथ टीसी या पर्यायावर क्लिक करणे) 

१६. जर सेम स्कूल असेल तर डिव्हिजन वर क्लिक करणे

१७. Update या बटनावर क्लिक करणे. 

१८. यशस्वी असा मेसेज येतो. 


अशा प्रकारे आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी अपडेट करून घ्यावेत. जेव्हा संपूर्ण शाळेची माहिती अपडेट होईल त्यावेळी फायनलाईज या बटणावर क्लिक केल्यास हे विद्यार्थी यावर्षीचा यु डायस प्लस वर दिसतात. 

सर्वांना शुभेच्छा.... 👍



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

6 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.