YCMOU Examination Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परीक्षा अर्जासाठी वाढीव अंतिम मुदत कोणती?

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत विद्यापीठाने पुन्हा एकदा वाढवले आहे.





यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत विविध शिक्षणक्रमाच्‍या हिवाळी सत्रनिहाय परीक्षा डिसेंबरच्‍या दुसऱ्या आठवड्यापासून होणार आहेत. परीक्षांना प्रविष्ठ होण्याच्‍या उद्देशाने विद्यापीठाने सूचना जारी केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २५ सप्‍टेंबरपर्यंत आहे. (Deadline till 25th september for examination application of ycmou nashik news)


पदवी, पदविका, पदव्‍युत्तर पदवी अशा विविध स्‍तरावरील सुमारे सत्तरहून अधिक अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा होणार आहेत. मुक्‍त विद्यापीठाच्‍या विविध शिक्षणक्रमाच्‍या हिवाळी सत्रनिहाय परीक्षा डिसेंबरच्‍या दुसऱ्या आठवड्यापासून होणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर ऑक्‍टोबरच्‍या शेवटच्‍या आठवड्यात उपलब्‍ध होईल.सोळा अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्‍या सर्व पुनर्परीक्षार्थींनी ऑनलाइन अर्ज भरायचे आहे. कृषी अभ्यासक्रमांसाठी नोंदणी कालावधी प्रवेश घेतल्‍यापासून तीन वर्षांसाठी वैध राहील.

कृषी शिक्षणक्रमासाठी पुनर्नोंदणी करता येणार नाही. कालावधी संपल्‍यानंतर नव्‍याने प्रवेश घ्यावा लागेल. विनाविलंब शुल्‍क परीक्षा अर्ज करण्याची मुदत २५ सप्‍टेंबरपर्यंत आहे.२६ ते ३० सप्‍टेंबर कालावधीत शंभर रुपये विलंब शुल्‍कासह अर्ज करता येईल. पाचशे रुपये विशेष विलंब शुल्‍कासह १ ते ६ ऑक्‍टोबरदरम्‍यान अर्ज करता येणार आहे. जितके विषय अनुत्तीर्ण आहेत, तितक्‍या विषयांकरिता परीक्षा शुल्‍क आहे. परीक्षा अर्ज आणि शुल्‍क प्रत्‍येक अनुत्तीर्ण सत्र, वर्षासाठी भरावे लागेल.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.