शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित तसेच जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी प्रणाली द्वारे करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
सदर निर्देश हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, मुख्य लेख वित्त अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक व माध्यमिक यांचे साठी देण्यात आले आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील FAST CMP कार्यान्वित असलेल्या ९ जिल्हयांमधील (रायगड, पुणे, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम, वर्धा.) जिल्हा परिषदेच्या शाळांमधील, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील तसेच पुणे व कोल्हापूर विभागातील महानगरपालिका/नगरपालिका/कटक मंडळ यांचे मार्फत चालविल्या जाणा-या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे सप्टेंबर २०२३ चे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत करण्याची आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. सदर टप्पातील आहरण व संवितरण अधिका-यांची यादी संदर्भिय शासन पत्रासोबत जोडली आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास तसेच शासनास अवगत करावे.
मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.
(दिपक चवणे) शिक्षण उपसंचालक
(अंदाज व नियोजन) शिक्षण संचालनालय,म.रा., पुणे १.
वरील परिपत्रकानुसार या अगोदरच काही जिल्हा परिषद यांनी सीएमपी प्रणालीचा अवलंब करत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे वेळेवर करण्याचा प्रयत्न केला आहे ही प्रणाली आता राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू करावी असे निर्देश माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिले आहेत अर्थातच या प्रणालीमुळे वेदनास होणाऱ्या विलंब हा कमी होतो असे ज्या ठिकाणी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे त्या ठिकाणावरून आलेल्या अभिप्राय करून लक्षात आले आहे.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments