शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचान्यांचे ७ वा वेतन आयोग फरकाचे हप्त्यांची माहिती अद्यावत करणेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट

शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलढाणा यांनी दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार  शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचान्यांचे ७ वा वेतन आयोग फरकाचे हप्त्यांची माहिती अद्यावत करणेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट


जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षकांचे ७ वा वेतन आयोग फरक १ला व २ रा हप्ता अदा करणेकरिता अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यानुषंगाने आपणास सुचित करण्यात येते की आपल्या अस्थापनेवरील सेवानिवृत्त शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांचे ७ वा वेतन आयोग फरक १ला व २ . हप्ता प्रलंबोत असल्यास त्याबाबतचे ऑफलाईन देयके लेखा शाखा शिक्षण विभाग (प्राथमिक) येथे दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ पूर्वी सादर करावे. देयका सोबत फरकाचे विवरणपत्र व सदर फरक यापुर्वी देण्यात आलेला नसलेबाबतचे गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे.


उपरोक्त विषयान्वये कार्यरत कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोग फरक १ला व २ रा हप्ता हा शालार्थ प्रणाली अंतर्गत माहे ऑक्टोबर २०२३ चे देयकासोबत अदा करावयाचा असल्याने याबाबतच्या नोंदी शालार्थ प्रणालीअंतर्गत उपलब्ध टॅव मधून शालार्थ जिल्हा समन्वयक यांनी तयार केलेल्या User Manual चा उपयोग करून अद्यावत करण्यात याव्यात. शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत माहे मार्च २०२३ मध्ये पंचायत समिती देऊळगांव राजा सिंदखेड राजा शेगांव, जळगांव, मलकापूर, मोताळा व नांदुरा यामधील कार्यरत DCPS धारक शिक्षकांना ७ वा वेतन आयोग फरक १ ला व २ रा हप्ता करिता ऑफलाईन पद्धतीने अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. अशा शिक्षकांची त्याबातची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये अद्यावत करण्यात यावी.


जे शिक्षक आजरोजी कार्यरत शाळेवर आंतरजिल्हा बदली / जिल्हांतर्गत बदलीने रुजू झालेले आहेत व त्यांचे ७ वा वेतन आयोग फरक १ ला / २ रा हप्ता अदा करण्यात आलेला नाही अशा शिक्षकांचे बदलीपुर्वीच्या अस्थापनेच नादेय प्रमाणपत्र व फरकाचे विवरणपत्र घेण्यात यावे. शालार्थ प्रणालीमध्ये नोंद करतांना केवळ फरकाचे विवरण पत्रावरूनच करण्यात यावी. तसेच माहे ऑक्टोबर २०२३ चे ऑनलाईन देयकासोबत फरकाचे विवरण व ना देय प्रमाणपत्र जिल्हा कार्यालयास सादर करण्यात यावे.


यानंतर कोणत्याही परिस्थितीत ७ वा वेतन आयोग फरक १ला व २ रा हप्ता करिता अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार नाही. याची गांभीयांने नोंद घ्यावी. यानंतर आपले पंचायत समिती / शाळेवरील शिक्षक यांचा फरक प्रलंबीत राहील्यास त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी आपली राहील. एकाही शिक्षकांना ७ वा वेतन आयोग फरकाचा १ ला / २ रा हप्ता यापुर्वी अदा करण्यात आल्यानंतरसुद्धा दुबार अदा होत आहे, अशी बाब जिल्हा कार्यालयाचे निदर्शनास आल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता आर्थिक अनियमितता केल्याबाबतची संबंधीत मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांचे विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येईल. त्यामुळे यापुर्वी फरक अदा करण्यात आलेला नसलेबाबत मुख्याध्यापक / गटशिक्षणाधिकारी यांनी स्वतः खात्री करावी.


शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परीषद बुलडाणा




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

2 Comments

  1. जिल्हा अंतर्गत प्राथमिक शिक्षक बदली २०१३ कधी सुरु होणार आहे sir सर कृपया post करावे सर .....

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.