जिल्हा परिषद शिक्षक बिंदू नामावली बाबत सचिव स्तरावर दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये...
मा. प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व मा. सचिव, सामान्य प्रशासन विभाग (सा.वि.स.) यांचे उपस्थितीमध्ये शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली अंतिम करताना जिल्हा परिषद स्तरावर येत असलेल्या अडचणीबाबत सर्व क्षेत्रिय अधिकारी यांची दिनांक २०.०९.२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये शिक्षक पदभरतीकरिता बिंदूनामावलीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये जिल्हा परिषदेने शासनास बिंदु बदलास परवानगी देण्याबाबत तसेच मागासवर्ग कक्ष यांच्याकडून उपस्थित केलेल्या त्रुटीबाबत देखील चर्चा करण्यात आली.
सविस्तर चर्चेअंती बैठकीत खाली नमूद विषयांवर कार्यवाहीबाबत सूचना देण्यात आल्या.
१. सद्यःस्थितीत राज्यातील १४ जिल्हा परिषदांच्या बिंदू नामावल्या तपासून अंतिम झालेल्या आहेत. उर्वरित जिल्हा परिषदांच्या बिंदू नामावलीबाबत सहाय्यक आयुक्त, मावक संबंधित विभागीय आयुक्त कार्यालय यांनी उपस्थित केलेल्या त्रुटींची पुर्तता संबंधित जिल्हा परिषदेने दिनांक २२.०९.२०२३ पर्यंत करावी. २. सहाय्यक आयुक्त, मायक यांनी बिंदू नामावली अंतिम करण्यासाठी वेळापत्रक निश्चित करावं. बिंदु नामावलीच्या कामासाठी अधिकच्या मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी बिंदू नामावलीच्या कामकाजाचा अनुभव असणारा कर्मचारी वर्ग आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून द्यावा.
३. प्रचलित शासन निर्णय व कार्यपध्दतीचा अवलंब करुन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी बिंदू नामावली सहायक आयुक्त, मागासवर्ग कक्ष यांचेकडे पाठवावी. सहायक आयुक्त, मागासवर्ग कक्ष यांनी त्याची यथोचित तपासणी करावी व त्यामध्ये काही सुधारणा अथवा बदल असल्यास तो बाव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद याचे निदर्शनास आणून द्यावी, या बदलासह नियुक्ती प्राधिकारी या नात्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुधारित बिंदूनामावली तयार करुन सहायक आयुक्त, कार्यालय यांचेकडे तपासणीसाठी पाठवावी व सहायक आयुक्त, मावक यांनी सदर बिंदूनामावली तात्काळ तपासून प्रमाणित करून द्यावी.
१४. पायतिरिक्त बिदुनामावली तपासणीच्या अनुषंगाने सहायक आयुक्त, मायक यांच्या स्तरावर निर्णय घेणे शक्य नसल्यास व अशा प्रकरणी शासनाची मान्यता घेण्याची आवश्यकता वाटल्यास केवळ अशीच प्रकरणे शासनाकडे मार्गदर्शनार्थ सादर करावी.
बिंदू नामावली अद्ययावत करतांना आंतरजिल्ह बदलीने आलेल्या शिक्षकांच्या याची मूळ नियुक्ती झालेल्या मूल शिक्षणाधिकारी यांनी बदली झालेल्या ठिकाणच्या शिक्षणाधिकारी यांना संध शिक्षकांची आवश्यक ती माहिती विनाविलंय उपलब्ध करून द्यायी. ६. ग्राम विकास विभागाने दिनांक २९/११/२०१७ च्या न्यये उपआयुक्त (आस्थापना) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या चौकशी समित्यांचा अहवाल संबंधित सहायक आयुक्त, मायक यांना पाठविण्यात यावा व त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी.
७. बिंदू नामावलीची अंतिम तपासणी झाल्यानंतर उपलब्ध होणारी मुद्दे विचारात घेवून अंतर जिल्हा दयावतची कार्यवाही करणे शक्य होईल. त्यानंतर पद भरतीसाठी रिक्त पदांची स्थिती निश्चित होईल. त्यामुळे विदुनामावली अद्ययावत करण्याची कार्यवाही पुढील एक आठवडयात पूर्ण करावी.
वरीलप्रमाणे दिलेल्या निदेशानुसार कार्यवाहीच्या सूचना देऊन बैठक संपन झाली..
वरील बैठकीचा संपूर्ण इतिवृत्त पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा..
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments