सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
पाच सप्टेंबर हा भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो यावर्षी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 4 सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या क्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
दि. २० जुलै, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने दयावयाच्या प्रशिक्षणामध्ये अंशत: बदल करुन तीन आठवडयाच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाऐवजी १० दिवसांचे अथवा घडयाळी ५० तासांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयान्वये प्रशिक्षण सुरु होण्याचा कालावधी अंदाजित करुन दिनांक ३१/१०/२०२१ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या अथवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्यात आली होती. सदर निर्णय संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना देखील लागू करण्यात आला आहे.
तथापि, प्रशिक्षण कार्यक्रमाचे विकसनानंतर प्रत्यक्षात दि. १ जून २०२२ पासून प्रशिक्षण सुरु करण्यात आल्याने तसेच प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर, प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी देण्यात आल्याने वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र दि. ३१/०५/२०२२ अखेर सेवानिवृत्त तसेच काही प्रकरणी दि. ३१/०७/२०२२ अखेर सेवानिवृत्त शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अशा वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणातून सवलत देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
शासन निर्णय :-
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने दयावयाच्या प्रशिक्षणाबाबत निर्गमित शासन निर्णय दि. २०/०७/२०२१ मधील परिच्छेद क्र. ५ मध्ये नमूद प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्याबाबतची मुदत शासन स्तरावरून प्रशिक्षणाचे आयोजन न झाल्याने / प्रशिक्षणाची संधी उपलब्ध न झाल्याने वाढविण्यात येत असून, दि. ३१ जुलै २०२२ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांना/ मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्यात येत आहे.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३०९०४१८०८३८९५२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(शितल पाटील)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments