पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) चॅटबॉटवर शिक्षकांनी नोंदविणे बाबत प्रशिक्षण युट्युब लिंक

 पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) चॅटबॉटवर शिक्षकांनी  नोंदविणे बाबत प्रशिक्षण  आज दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे द्वारे आयोजित केले आहे यासाठी राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकारी यांना उपस्थित राहण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

  


    वरील विषयान्वये STARS प्रकल्पामधील SIG - 2 Iimproved Learning Assessment System  नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत  पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन  करण्यात येत  आहे.

राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९  ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते.  

       विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक  सोबत देण्यात येत आहे. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२:०० ते ०१:३० या कालावधीत यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येईल.संबधित  शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण  यु-ट्युबद्वारे घेण्याबाबत कळविण्यात  यावे.  प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी  पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणे आवश्यक आहे.


जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथमिक)यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी द्यावी .सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चॅटबॉटवर  पायाभूत चाचणीचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे, अशा इयत्ता तिसरी ते आठवी शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक मदतीसाठी श्री. वेंकटेश अनंतरामन ८०००४९४७६४ यांचेशी संपर्क करण्यात यावा.


  तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे.


यु-ट्यूब लिंक:     https://www.youtube.com/live/oC0gFdpOOV0?si=18vatwfwV7tNslrk


PAT चॅटबॉट मार्गदर्शिका:  https://bit.ly/PATManual 


      अमोल येडगे,(भा.प्र.से)

               संचालक,

   राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,  पुणे



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.