राज्यात केंद्रपुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी अंमलबजावणीची सुरुवात झालेली आहे. राज्याचे सन २०२२-२३ व सन २०२३-२४ असे दोन वर्षांचे एकत्रित उद्दिष्ट (निरक्षरांची संख्या) १२ लक्ष ४० हजार इतके निर्धारित करण्यात आलेले असून संदर्भ क्र.२ नुसार याला मान्यता मिळाली आहे. संदर्भ क्र. ३ ची प्रभावी अंमलबजावणी होणेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत थेट शाळेशी संबंधित प्रौढ शिक्षण विषयक टास्क क्रमांक जरो २४३ (निरक्षर व्यक्तींचा शोध घेणे) २४४ (सर्वासाठी शिक्षण है उदिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा परिणामकारक उपयोग करणे २५० (शाळा इमारत व परिसराचा अध्यापन करणेसाठी उपयोग करणे ) २५३ (ऑनलाइन / ऑफलाईन अध्ययन अध्यापन पद्धतीने निरक्षर व्यक्तीना साक्षर करणे इत्यादी टास्क निश्चित करण्यात आले आहे.
संदर्भ क्र. ४ नुसार केंद्र शासनाच्या NILP APP ( ULLAS) पर स्वयंसेवकांची नोंदणी व निरक्षरांची नोंदणी करणेबाबत MOBIL APP चे ऑनलाइन प्रशिक्षण सर्व क्षेत्रीय यंत्रणेस YOUTUBE द्वारे राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण, संस्था, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत दि.२.६.२०२३ रोजी देण्यात आलेले आहे. संदर्भ क्र.५ अन्वये, या योजनेच्या मार्गदर्शक सूचना व वर्षभराचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आलेले आहे. संदर्भ क्र. ६ अन्वये, निरक्षरांची सांख्यिकीय माहिती व महसूल गावनिहाय यादी उपलब्ध होण्यासाठी OFFINE सर्वेक्षणाबाबत सविस्तर सूचना आवश्यक प्रपत्रांसह दिलेल्या आहेत. भारत सरकारच्या संदर्भ क्र.७ च्या पत्रानुसार निरक्षरांची FLN चाचणी घेणेबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यास अनुसरून या कार्यालयाने संदर्भ क्र.८ अन्वये निरक्षर व स्वयंसेवक यांची माहिती "ULLAS MOBILE APP वर दि. ५/९/२०२३ पर्यंत मरणेबाबत व राज्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार साक्षरता सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविण्याबाबत आपणास कळविलेले आहे. संदर्भ क्र. ९ नुसार दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत संपन्न झालेल्या निरक्षर व्यक्ती शोध मोहिमेत प्राप्त झालेली माहिती गुगल लिंक वर भरणेबाबत (प्रपत्र १२ प्रपत्र १३) आपणास कळविलेले आहे. संदर्भ क्र. १० अन्वये या कार्यालयाने या योजनेच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती राज्यशासनास सादर केली आहे.
सदर योजनेचा राज्यात प्रचार व प्रसार होणेसाठी दि. १ सप्टेंबर २०२३ ते दि. ८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत "साक्षरता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून निरक्षर व्यक्तीना साक्षर करण्याच्या कार्याला ( अध्ययन-अध्यापनास) प्रारंभ करावयाचा आहे. या योजनेसाठी प्रौढ शिक्षण ऐवजी "सर्वांसाठी शिक्षण" अशी संज्ञा वापरण्यात येत असून राज्य शासनाकडून साक्षरतेकडून समृद्धीकडे ही Tag Line दिलेली आहे. केंद्रशासनाने या योजनेच्या अमलबजावणीसाठी शाळा हे एकक (Unit) निश्चित केलेले आहे. ज्याअर्थी, शाळा हे या योजनेसाठी एकक ठरविण्यात आलेले आहे त्याअर्थी, संबंधित शाळेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याध्यापक / प्राचार्य हे सदर योजनेचे अंमलबजावणी प्राधिकारी आहे व शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदर कार्यक्रमाच्या महसूल गाव स्तरावर अंमलबजावणीसाठी सर्वस्वी जबाबदार आहे. यास्तव निरक्षरांचे सर्वेक्षण व ONLINE नोंदणी, स्वयंसेवकांची निवड व नोंदणी, स्वयंसेवकांद्वारे निरक्षरांना अध्यापन आणि नव साक्षराची परीक्षा घेऊन त्यांना साक्षरतेचे प्रमाणपत्र देणे यामध्ये शाळेची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. शाळांनी खालीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे.
१) दि. ८ सप्टेंबर २०२३ आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनी निरक्षर व्यक्तींचे प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन OFFLINE पद्धतीन सुरु करावयाचे आहे. त्याअनुषंगाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टानुसार (निरक्षरांच्या संख्येनुसार ( ONLINE किंवा स्वयंसेवकांची (स्वयंसेवक जसे इयत्ता आठवी आणि त्यावरील शालेय विद्यार्थी, NCTE अंतर्गत Teacher 14 Education Institute M.EG/B.ED./D.EL.Ed/B.T.C. अभ्यासक्रम मधील सेवापूर्व विद्यार्थी उच्च शिक्षण संस्थातील शिक्षक व शिक्षण घेणारे विद्यार्थी NYKS, NSS NCC CSOS चे स्वयंसेवक गृहिणी, अंगणवाडी सेविका शिक्षक पंचायत राज संस्था आणि इतर स्वयंसेवी संस्थाचे सहकार्य घेता येईल) व निरक्षर व्यक्तींची नोंदणी "ULLAS MOBILE APP" वर करून शाळास्तरावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी नोंद करावी. शाळेस निर्धारित केलेले उद्दिष्ट साध्य करण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांची आहे याची नोंद घ्यावी.
सर्वेक्षणासाठी मोबाईल ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.
२) केंद्र शासनाच्या सूचनेनुसार दि. २४ सप्टेंबर २०१३ रोजी वर्ष २०२३ २४ साठी प्रथम पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मक मूल्यांकन चाचणी (FLNAT) चे आयोजन करणेबाबत कळविलेले आहे. तरी चाचणी परीक्षेच्या अनुषंगाने निरक्षर व्यक्तीना चाचणी परीक्षेच्या तयारीसाठी उपलब्ध होणारा कालावधी फार कमी आहे. यास्तव अध्ययन अध्यापनारा पुरेसा कालावधी उपलब्ध व्हावा यासाठी प्रस्तावित चाचणी ऑक्टोबर २०२३ च्या शेवटच्या आठवडयात परवानगी देण्यात यावी अशी राज्यशासनास केंद्रशासनाकडे संदर्भ क्र.१० च्या पत्राने विनंती करणेबाबत कळविलेले आहे. प्रस्तावित चाचणी परीक्षा NIOS मार्फत घेण्यात येणार
आहे. ३) निरक्षर व्यक्तीना अध्यापन करण्यासाठी शाळास्तरावर FLN चा अभ्यासक्रमाचा उपयोग करावा, निपुण भारत कार्यक्रमांतर्गत दीक्षा पोर्टल पर अपलोड VIDEO ची मदत घेणे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेची मदत घ्यावी. ४) अन्यास वर्ग, जागा उपलब्धता, वेळापत्रक यासाठी दि ४.०७.२०२३ चे संचालनालय स्तरावरील संदर्भीय पत्राचा उपयोग करावा. तसेच शासन निर्णय दि. १४.१०.२०२२ चे अवलोकन करावे. ५) शाळास्तरावर निरक्षरांचे अध्ययन-अध्यापन सुरु झाल्याचा अहवाल केंद्रप्रमुख यांच्यामार्फत गट शिक्षणाधिकारी [व] शिक्षणाधिकारी योजना यांना शाळांनी सादर करावा.
सदर बाबतचे संपूर्ण प्रशिक्षण युट्युब वर पाहण्यासाठी खालील लिंक वर टच करा.
तरी उपरोक्त नमूद मुख्यांप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील शाळा मुख्याध्यापक / प्राचार्य, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख यांना कळवा व केलेल्या कार्यवाहीबाबत तात्काळ अवगत करावे. सोबत सर्व संदर्भीय पत्रे.
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक,
शिक्षण संचालनालय (योजना)
महाराष्ट्र राज्य, पुणे तथा सदस्य सचिव राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments