शासन परिपत्रकान्वये दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असून राज्य शासकीय कर्मचारी नाही. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांना शासनाचे कोणतेही नियम, अधिनियम, शासन निर्णय, शासन परिपत्रक इत्यादी थेट लागू होत नाही आणि लागू करावयाचे असल्यास ग्राम विकास विभाग स्वतंत्र आदेश काढून सदर बाबी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करतो. त्यामुळे संदर्भ क्र. १ चा शासन निर्णय राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे शासन परिपत्रक प्रसृत करण्यात येत आहे.
शासन परिपत्रक:-
वित्त विभाग, महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक: वेतन- २०२३/प्र.क्र.१३/सेवा-३, दि. २८.०६.२०२३, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना लागू करण्यात येत आहे. २. सर्व जिल्हा परिषदांनी सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करुन, संपूर्ण राज्यभरात १ जुलै रोजीच्या काल्पनिक वेतनवाढीच्या अनुषंगाने चालू असलेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये मा. न्यायालयास उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात आणू देण्यात यावी व संबंधित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्याची मा. न्यायालयास विनंती करण्यात यावी.
३. सदर शासन परिपत्रक वित्त विभागाच्या अनौ.सं.क्र.३१८/२३/सेवा-३, दि. ३०.०८.२०२३
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०९१२११४७५८२३२० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. 'DEEPAK" महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावाने व आदेशानुसार..
(दिपक बाळकृष्ण राऊत )
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments