CHATBOT Update - पायाभूत चाचणीचे गुण PAT महाराष्ट्र या चाटबॉटवर नोंदवणे मुदतवाढ देणेबाबत संचालकांचे आदेश

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार पायाभूत चाचणीचे गुण PAT महाराष्ट्र चाटबॉटवर नोंदविणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


STARS प्रकाल्पामधील SIG २ limproved Learning Assessment - System नुसार सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्याथ्र्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ चे आयोजन करण्यात येत आहे.


उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार राज्यात पायाभूत चाचणीचे आयोजन दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणी शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील असेही कळविण्यात आलेले होते.


संदर्भ क्र. २ नुसार विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटवॉटवर पायाभूत चाचणीचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंक सोबत देण्यात 

आलेल्या आहेत. तसेच PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे दि. १४ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी ठीक १२:०० ते ०१:३० या कालावधीत यु-ट्युबद्वारे प्रशिक्षणही शिक्षकांना देण्यात आलेले आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी पायाभूत चाचणीचे गुण दि. १४ ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेबाबत कळविण्यात आले होते.


तथापि याबाबत अद्यापही पाहिजे प्रतिसाद दिसून येत नाही. तरी सदर बाबत प्राध्यानाने घेवून दि. २५/०९/२०२३ पर्यंत इयत्ता तिसरी ते आठवी शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्याचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक मदतीसाठी श्री. पैकटेश अनंतरामन ८०००४९४७६४ यांचेशी संपर्क करण्यात यावा.


तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक का र्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात यावे..


यु ट्यूब लिंक : https://www.youtube.com/live/oC0gFilpooV0?si=18vatwfwVZtNslrk PAT चाटबॉट मार्गदर्शिका https://bit.ly/PATManual


संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषद, महाराष्ट्र, पुणे


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.