राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद देणे दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) आयोजनाबाबत पुढील प्रमाणे निर्देश देऊन अकारिक मूल्यमाप अंतर्गत संकलित मूल्यमापन अंतर्गत प्रथम सत्र परीक्षा व द्वितीय सत्र परीक्षा वेगळी न घेणेबाबत पुढील प्रमाणे स्पष्ट असे निर्देश दिले आहेत.
या परिपत्रकानुसार आता.
दिवाळीपूर्वी होणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेचे देखील वेगळे पेपर घेण्याची गरज नाही सदर पेपर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पायाभूत चाचणी प्रमाणे पुरवणार आहे. पायाभूत चाचणीचे पेपर आपण आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले होते त्याचप्रमाणे संकलित मूल्यमापन प्रथम सत्र व द्वितीय सत्र परीक्षा पेपर देखील उपलब्ध करून देण्यात येईल.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पुरवलेल्या पेपरवितिरिक्त इतर पेपर शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये घेण्याची गरज नाही.
अर्थात सदर परिपत्रकात द्वितीय घटक चाचणी बाबत मात्र कोणतीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
त्याचप्रमाणे वर्ग पहिली व दुसरीच्या चाचणी परीक्षा व प्रथम सत्र द्वितीय सत्र परीक्षा ह्या स्थानिक पातळीवर पूर्वीप्रमाणेच घ्याव्या लागतील.
वर्ग तिसरी ते आठवी साठी जे विषय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत चाचणीसाठी किंवा परीक्षेसाठी घेण्यात येणार नाहीत त्या विषयांच्या देखील चाचण्या पूर्वीप्रमाणेच स्थानिक पातळीवर घ्याव्या लागतील.
STARS प्रकल्प मधील SIG २ (Improved Learning Assessment systems) २.२ अंतर्गत सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यास अनुसरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. एकूण दहा माध्यमात चाचणी होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
यास अनुसरून राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवी च्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (विद्यानिकेतन/सराव पाठशाळा, समाजकल्याण विभाग (शासकीय), आदिवासी विकास (शासकीय), जिल्हा परिषद, मनपा, नपा, नप, शासकीय सैनिकी शाळा, कटक मंडळ, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल) या शाळांमधील विद्यार्थ्याच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक चाचण्यांचा पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात येणार आहे.
तथापि सदर चाचण्या अंतर्गत पायाभूत चाचणी दिनांक १७.०८.२०२३ ते १९.०८.२०२३ या कालावधीत घेण्यात आलेली आहे. तर संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १ व संकलित मूल्यमापन चाचणी सत्र २ यांचे खालील प्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे.
चाचणी कालावधी/संभाव्य कालावधी
१
संकलित मूल्यमापन चाचणी सत्र
१ माहे ऑक्टोबर २०२३ शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबर पहिला आठवडा २०२३
२
संकलित मूल्यमापन चाचणी सत्र
२ एप्रिल २०२४ पहिला / दुसरा आठवडा.
* संकलित मूल्यमापन चाचणीचा अभ्यासक्रमः
१. संकलित मूल्यमापन सत्र १ प्रथम सत्रातील अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.
२. संकलित मूल्यमापन सत्र २ द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती /मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.
तरी उपरोक्त प्रमाणे सन २०२३ २४ या शैक्षणिक कालावधीत इयत्ता ३ री ते ८ वी च्या इयत्तांसाठी तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत. संकलित मूल्यमापन चाचणी सत्र १ व २ या संकलित मूल्यमापन चाचणीच्या अनुषंगाने आहेत. यामुळे शाळांनी इयत्ता ३ री ते ८ वी (प्रथम भाषा, गणित व इंग्रजी) या विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ पुन्हा नव्याने घेवू नयेत. उपरोक्त चाचणीत मिळालेले गुण हे संकलित मूल्यमापन चाचणीचे गुण समजण्यात यावेत. या चाचण्यांची गुणनोंद सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवहीमध्ये घेण्यात यावी. तसेच इतर विषयांच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तर चाचणीच्या धर्तीवर तयार करून संकलित १ व २ चे मूल्यमापन करावे.
(रमाकांत काठमोरे)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteOk
Delete