नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या गटशिक्षणाधिकारी यांना त्यांच्या तालुक्यांमध्ये कार्यरत शिक्षकांना जर एखाद्या परीक्षेस बसावयाचे असल्यास त्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार दिले आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांना जर एखादी परीक्षा द्यावयाची असेल तर त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर परवानगी देण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना देणेबाबत पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.
आदेश
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील नियम 95 व 96 (1) नुसार मला प्रदान केलेल्या अधिकारांपैकी संदर्भ क्र. 4 अन्वये अधिकार विभाग प्रमुखांना प्रदान केलेले आहेत. संदर्भ क्रं. 4 सह सलंग्नित विवरणपत्रात नमूद अ.क्रं. 51 नूसार जि.प. शाळेतील शिक्षकांना शैक्षणिक पात्रता वाढविण्याचे दृष्टीने उच्च शिक्षण घेण्यास्तव परिक्षेला बसण्याची परवानगी देण्याचं अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथ) यांना प्रदान करण्यात आले होते..
तथापी शिक्षण विभाग (प्राथमिक) चा कामाचा व्याप तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक), यांचेकडील जबाबदा-या लक्षात घेता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडील अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात येत असून याद्वारे मी सौम्या शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.) जि. प. नागपुर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 96 (1) चे तरतुदीनुसार, गटशिक्षणाधिकारी यांना, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना शैक्षणिक पात्रता वाढविण्याचे दृष्टीने तसेच उच्च शिक्षण घेण्याकरीता परिक्षेला बसण्याची परवानगी देण्याचे अधिकार प्रदान करीत आहे.
प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार काटेकोरपणे करण्याची
संपूर्ण जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांची राहील.
तव्दतच यापूर्वी संदर्भ क्रं. 4 मधील विवरणपत्रातील अनु क्र. 51 अन्वये शिक्षणाधिकारी (प्राथ.)
यांना प्रदान केलेले अधिकार, अधिक्रमित करण्यात येत आहे. सदर आदेश या आदेशाच्या दिनांकापासून अमलात येतील. आदेशाच्या दिनांकापूर्वीचे प्रस्तायांस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मंजूरी प्रदान करतील,
मुळ प्रत मा. मु.का.अ. व्दारा अनुमोदीत.
-स्वा-
(सोम्या शर्मा, भा.प्र.से) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपुर करीता
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
1 Comments
उच्च शिक्षण परवानगी letter PDF पाहिजे..
ReplyDelete