IBPS-PO, LIC-AAO पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत एकूण सहा महिन्याच्या प्रशिक्षण काळात दरमहा रु.6000/- विद्यावेतन देण्यात येणार आहे. चाळणी परीक्षेव्दारा विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.
यासाठी अर्ज करण्यास अंतिम दिनांक 21/09/2023 आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), महाराष्ट्र राज्य, नागपूर (महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था)
IBPS-PO,LIC-AAO - 2023-24 परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरीता नोंदणी अर्ज.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर संस्थेकडुन IBPS PO, LIC AAO परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता OBC / VJNT/ SBC या संवर्गातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर सुचना फलक / Notice Board मध्ये उपलब्ध " Application for IBPS PO, LIC AAO Pre Exam Training 2023-24” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने दिनांक - 21/09/2023 पर्यंत अर्ज करावा. सदर संकेतस्थळावर अर्जाचा तपशिलवार माहिती उपलब्ध आहे. नमुना व
टिप:- टपालद्वारे / प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
(राजेश खवले)
व्यवस्थापकीय संचालक महाज्योती, नागपूर
संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) नागपूर मार्फत राज्यातील नॉन
क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील
farretarat IBPS-PO,LIC-AAO-2023 - 24"
IBPS PO, LIC AAO 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 600 विद्यार्थ्यांना 2023-24 मधील सत्रातील IBPS PO
परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत अनिवासी पध्दतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
योजनेचे स्वरुप :-
IBPS POLIC AAO 2024 या परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर
मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत अनिवासी
प्रशिक्षण देण्यात येते.
प्रशिक्षणाचा कालावधी :- 6 महिन्यांकरिता विद्यावेतन - रु.6000/- प्रती माह (किमान 75% हजेरी असल्यास)
प्रशिक्षणार्थी संख्या
:- नागपूर 300
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) 300
अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता:
1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.
3. विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी
4. विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेला किंवा पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी
सुध्दा या प्रशिक्षणाकरिता अर्ज करु शकतात.
5. वय मर्यादा :- 20 ते 33 वर्ष
ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. जातीचा प्रमाणपत्र
13. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
4. 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र 5. पदवी उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
6. पदव्युत्तर उत्तीर्ण गुणपत्रक किंवा पदव्युत्तरच्या शेवटचा वर्षांचे प्रमाणपत्र
7. दिव्यांग असल्यास 40% पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचा सक्षम प्राधिका-याचा दाखला
8. बँकेचे खाते आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न असावे.
क. अर्ज कसा करावा.
1. महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील IBPS PO LIC AAO 2023 24 यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जासोबत व मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.
3. पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
अर्जासोबत जोडावे.
सामाजिक प्रवर्गनिहाय विभागणी :
1) इतर मागास वर्ग (OBC) 59%
2) निरधीसुचीत जमाती अ (VJ-A ) 10%
3) भटक्या जमाती व (NT-B) 8%
4) भटक्या जमातीक (NTC) 11%
5)भटक्या जमाती (NT-D) 6%
6) विशेष मागास प्रवर्ग (SBC) 6%
एकूण 100%
ड. आरक्षण:-
1. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 30% जागा महिलांसाठी आरक्षित आहे.
2. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
3. दिव्यांगासाठी 4 % जागा आरक्षित आहे.
इ. प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती
1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 21/09/2023 आहे.
2. विहित नमुन्यामध्ये कागदपत्रासहित अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांची छाननी परीक्षा घेऊन प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
3. प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास रुजु होतील त्या दिवसापासून त्यांना रु.6000/- प्रति महिना या दराने विद्यावेतन लागू होईल. प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच विद्यावेतन देण्यात येईल.
4. विद्यार्थ्यांनी विद्यावेतन जमा करण्यासाठी आधार क्रमांकाशी संलग्न बँक खाते देणे अनिवार्य आहे.
5. महाज्योतीकडे अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सारथी, पुणे या संस्थेकडील याच परीक्षेचा प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच महाज्योती कडील सदर प्रशिक्षणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा दुबार लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास विद्यार्थ्यांविरुद्ध नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
6. सदर प्रशिक्षणासाठी अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांने वरील अटी व शर्तीचा भंग केल्याचे तसेच चुकीची किंवा खोटी कागदपत्रे / माहिती सादर केल्यास त्यांचेवर झालेल्या प्रशिक्षण खर्चाची त्यांचेकडुन वसुली करण्यात येईल व यापुढे महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यास ते पात्र असणार नाही.
7. नमुद निकषांची पूर्तता न करणाऱ्या, अपूर्ण अर्ज सादर करण्याऱ्या किंवा अर्जासोबत कागदपत्रे सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज बाद करण्यात येईल.
8. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
9. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
10. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर पुढील क्रमांकावर संपर्क करावा : 07122870120/21
(राजेश खवले)
व्यवस्थापकीय संचालक,
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, ( महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments