दि.०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहीत केलेल्या धोरणानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांसाठी सन २०२२ ची आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबविण्यात आलेली आहे. तसेच दि.२३.०५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे.
तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्र.३ येथील दि.२१.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १ मध्ये सन २०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी, असे नमूद केले आहे. त्याअनुषंगाने, मा. प्रधान सचिव (ग्रामविकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.३१.०८.२०२३ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार आपल्या जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांची दि.०१.०९.२०२३ रोजी बिंदुनामावली निहाय रिक्त पदांची माहिती दि.०४.०९.२०२३ पर्यंत https://ott.mahardd.in या पोर्टलवर अद्यावत करण्यात यावी.
तसेच ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टलसाठी लॉगिन आयडी उपलब्ध करुन देण्याकरिता सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे नाव, मोबाईल नंबर व ईमेल आयडी याबाबत माहिती संबंधित जिल्हा परिषदांनी Vinsys IT Services (I) Pvt. Ltd, Pune यांना दि. ०४.०९.२०२३ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करुन द्यावी, ही विनंती.
(प्रशांत नावगे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये रिक्त असलेल्या शिक्षक पदांची यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments