Ycmou Admissions 2023-24 Update - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी मुदतवाढ!

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड., बी.एड. (विशेष), प्रथम वर्ष एम.बी.ए. इत्यादी शिक्षणक्रमां व्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2023 2024 या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेस खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.



ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क


भरण्याची मुदत


दिनांक 1 ऑगस्ट 2023 ते दिनांक 20 ऑगस्ट 2023



प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्र मान्यता मुदत


(रात्री 11.59 वाजेपर्यंत) दिनांक 1 ऑगस्ट 2023 ते दि. 26 ऑगस्ट 2023 पर्यत (रात्री 11.59 वाजेपर्यंत)


2) विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे त्यासाठी विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील होमपेजवर Admission या टॅबवर Prospectus 2023-24 या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.


3) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने वर नमुद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज व प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. 

4) विद्यार्थ्याने वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.


सहायक कुलसचिव नोंदणी कक्ष


संचालक, विद्यार्थी सेवा विभाग


प्रत माहितीसाठी


1) मा. कुलगुरू कार्यालय


(2) मा. कुलसचिव कार्यालय


प्रत माहितीसाठी व उचित कार्यवाहीसाठी


(1) सर्व वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, य.च.म.मु. विद्यापीठाचे सर्व विभागीय केंद्र यांनी सदरचे सूचनापत्र आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व अभ्यासकेंद्रांच्या निदर्शनास आणून द्यावे.


(2) सर्व विद्याशाखा / केंद्र / कक्ष


3) एम. के. सी. एल.


4) डाटा प्रोसेसिंग सुपरवायझर, विद्यार्थी सेवा विभाग





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.