महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०१ शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ ते ०३/०३/२०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल दि. २४/०३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक (SCORE CARD) वेबलिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात आले होते. सदर वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती.
http://ibpsonline.ibps.in/mscepjan23/scda_mar23/login.php?appid=307b76e19820efd6b5d48229113cce69
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२ या परीक्षेचा निकाल दि.. २४/०३/२०२३ रोजी लागला, तद्नंतर उमेदवारांच्या माहितीसाठी दिनांक २०/०४/२०२३ पर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमध्ये त्यांचे गुणपत्रक उपलब्ध करून देण्यात आले होते. उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करणेबाबत या कार्यालयाच्या दिनांक ३१/०३/२०२३ च्या प्रसिध्दी निवेदनाव्दारे सूचना देण्यात आली होती. दिनांक २०/०४/२०२३ नंतर याबाबतीत आलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही असे सूचित करण्यात आले होते. तरी सद्यास्थिती मध्ये सदर वेब लिक बंद करण्यात आली आहे.
सदर गुणपत्रक हे आपल्या माहितीसाठी असुन आपण सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या गुणयादीची प्रिंट काढून आपण ती माहितीसाठी वापरु शकता. पवित्र पोर्टल संबंधित गुणयादी परीक्षा परिषदेकडून मा. आयुक्त शिक्षण कार्यालयास उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ठिकाण : पुणे दिनांक: २१/०८/२०२३
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे -०१,
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments