Income Tax Return E-Verify-Verify Update - इन्कम टॅक्स रिटर्न जरी भरले असले तरी आपण ते व्हेरिफाय केले आहे का?

 जरी आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल परंतु तो व्हेरिफाय केला नसेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही व आपल्याला रिफंड होणारी रक्कम देखील रिफंड होत नाही.

इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून सर्व करदात्यांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात आली आहे.


प्रिय करदाते,


तुमची ई-फायलिंग प्रक्रिया आजच पूर्ण करा! फाइल केल्याच्या ३० दिवसांच्या आत तुमचा ITR सत्यापित करायला विसरू नका.


विलंबित पडताळणीमुळे प्राप्तिकर कायदा, 1961 च्या तरतुदींनुसार विलंब शुल्क आकारले जाऊ शकते.


उशीर करू नका, आजच तुमचा ITR सत्यापित करा!


आजच ITR सत्यापित करण्यास उशीर करू नका


 त्यामुळे आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याच्या दिनांक पासून 30 दिवसाचे आत इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफाय अथवा ई व्हेरिफाय करणे आवश्यक आहे.



वरील सूचना ट्विटर हँडल वर पाहण्यासाठी खालील लिंक वर टच करा.

https://twitter.com/IncomeTaxIndia/status/1695693465118462221?t=RjeEJEa1yqTSQe3RLrZQkQ&s=19


 इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफाय करण्याच्या दोन पद्धती आहे

1) इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर मिळणारी पावती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला बाय पोस्ट त्यावर सही करून पाठविणे.

किंवा

2) इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जाऊन आपल्या इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफाय करणे.


पहिली पद्धत ही वेळखाऊ पद्धत आहे कारण ऑफलाइन पोस्टाने कागद पोहोचायला वेळ लागतो व इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म व्हेरिफाय होण्यासाठी जवळपास दहा ते पंधरा दिवस लागतात.


परंतु दुसऱ्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईल लॅपटॉप किंवा पीसी वापरून काही मिनिटातच आपण आपला इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म व्हेरिफाय करू शकतो.

त्यासाठी आपला पॅन नंबर व इन्कम टॅक्स अकाउंट चा पासवर्ड आपल्याकडे असणे आवश्यक आहे. पासवर्ड नसला तरी तो रिसेट देखील करता येतो.

इन्कम टॅक्स च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण पॅन नंबर हा युजर आयडी वापरून व पासवर्ड टाकून आपल्या अकाउंटला लॉगिन झाल्यानंतर आपल्याला आपल्या अकाउंट मध्ये आपला भरलेला इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म दिसेल.

सदर इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म ची स्थिती देखील आपल्याला दिसेल जर तो या अगोदर व्हेरिफाय केलेला असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस पूर्ण झालेली दिसते जर पूर्ण झालेला नसते तर आपण वेबसाईटवरून E व्हेरिफाय हे ऑप्शन निवडून आपल्या आधार ओटीपी घेऊन आपला इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म काही सेकंदातच E व्हेरिफाय करू शकतो.

अधिकृत संकेतस्थळ.. 👇

https://www.incometax.gov.in/iec/foportal/



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.