शरद
पवार इन्सपायर फेलोशिप : शिक्षण
शिक्षण
उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील,
कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे हे शिक्षणातून अपेक्षित असते.
शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म
शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने
पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते
खरे शिक्षण.
शिक्षण क्षेत्रात नवे काही करु पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या
व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरु गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन
देण्यासाठी तसेच त्याना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण
काम व्हावे तसेच मुलभूत संशोधनास वाव मिळावा हा या फेलोशीपचा
हेतू आहे. चव्हाण सेंटरच्या वतीने २० प्राथमिक शिक्षक
आणि १० माध्यमिक शिक्षकाना ही फेलोशिप दिली जाणार आहे. सदर फेलोशिपची रक्कम साठ
हजार असेल.
आज घडीला
शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची नितांत आवश्यकता वाटते आहे. यावर्षी (२०२३ -२४ ) महाराष्ट्रातील २०
प्राथमिक आणि २० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप देण्यात आली. या फेलोशिप
अंतर्गत भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक
दृष्टिकोण रुजविणे, स्वयंअध्ययन आणि सहअध्ययन यांचा
अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत प्रभावी वापर, कला
व खेळ यांच्याशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचे आकलन वाढविणे, वाचन आणि आकलन वाढवण्यासाठीचे उपक्रम, पालक आणि
स्थानिक समाज यांचा शालेय कामकाजात आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभाग, शाळेची इमारत आणि परिसर यांचा शैक्षणिक साधन म्हणून वापर, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल लर्निंगचा प्रभावी वापर, असे उपक्रम या वर्षीच्या फेलोशिप प्राप्त शिक्षकांनी निवडले आहेत.
ही केवळ उदाहरणे म्हणून दिली आहेत, तरी परंतु आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, कोणते उपक्रम निवडावे याचे संपुर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना असेल. २०२४ -२५ च्या फेलोशिपसाठीची अर्ज प्रक्रिया २० ऑगस्ट २०२३ पासून होत आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२३ अखेर https://apply.sharadpawarfellowship.com या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
Themes
a) Teachers who involved in Scout Guide (स्कॉऊट गाइड)
b) Climate Change (हवामान बदल)
c) Special Education (विशेष शिक्षण)
d) Children’s Health (Mental and Physical) (मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य)
e) Sports
(खेळ)
f) Nature’s friend (निसर्ग मित्र, पर्यावरण
रक्षक)
g) Performing Arts (कला)
h) Crafts and Culture (संस्कृती आणि हस्तकला)
i) Gender Equity (लिंग समभाव)
j) Promoting Scientific Temper (वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवणे)
k) Inculcating Values of Indian Constitution (संविधानिक मूल्ये रुजवणे)
l) Reading Comprehensive (वाचन संस्कृति)
आणि या व्यतिरिक्त नावीन्य पूर्ण उपक्रम असतील तरीही आपण अप्लाय करू शकतो
फेलोशिपसाठी नियमावली
१) आपण ज्या संस्थेत काम करीत आहात त्या संस्थेचे
‘नवोपक्रम’ करण्यासाठी तुम्हाला परवानगी दिल्याचे पत्र सुरुवातीसच द्यावे लागेल.
२) आपण जो नवोपक्रम हाती घेणार आहात तो यापूर्वी
केलेला नसावा. मात्र पूर्वी केलेल्या प्रयोगाचे विस्तारीकरण (Extension ) करता येईल.
३) आपण करीत असलेला नवोपक्रम इतर कोणत्याही संस्थेत
सादर केलेला नसावा तसेच पुढेही तो सादर करता येणार नाही.
४ ) आपण घेतलेला उपक्रम कोणाचीही कॉपी असू नये. जर
दुसऱ्याची एखादी कल्पना घेवून काम करणार असाल तर तशी त्या व्यक्तीची पूर्वपरवानगी
घेतलेली असावी.
५ ) यशवंतराव चव्हाण सेंटर, ज्या ज्या वेळी यासंबंधीची
प्रशिक्षणे किंवा बैठका घेईल त्यावेळी अशा बैठकास किंवा प्रशिक्षणास उपस्थित राहणे
बंधनकारक राहील. अपरिहार्य अडचण असेल तर तशी कल्पना यशवंतराव चव्हाण सेंटरला देवून
परवानगी घ्यावी.
६ ) यशवंतराव चव्हाण सेंटरनी दिलेल्या वेळेतच आपला
उपक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. उपक्रमास उशीर झाला तर आपल्या फेलोशिपबाबतचा
अंतिम निर्णय चव्हाण सेंटरला असेल.
७ ) आपला उपक्रम चालू असताना यशवंतराव चव्हाण सेंटरचे
प्रतिनिधी कधीही तरीही पूर्व कल्पना देवून भेट देण्यास येतील. त्यावेळी त्यांना
सहकार्य करणे अपेक्षित आहे. जर या प्रतिनिधिंना कामाबाबत चुकीच्या गोष्टी ध्यानात
आल्या तर फेलोशिप संबंधी यशवंतराव चव्हाण सेंटर निर्णय घेईल.
८) नवोपक्रम अंतिम अहवाल सादर करताना आपल्या संस्था प्रमुखाचे पत्र जोडणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
१. |
इच्छुक शिक्षकांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पूर्वी https://apply.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा |
२. |
अर्जदारांनी फेलोशिपसाठी हाती घेत असलेल्या “शैक्षणिक परिवर्तन उपक्रमा” विषयी खालील मुद्दयांच्या आधारे सुमारे १००० शब्दांमध्ये (मराठी किंवा
इंग्रजी भाषेत) अर्जामध्ये दिलेल्या जागेत लिहावे. |
२.१ उपक्रमाचे शीर्षक |
|
२.२ उपक्रमाची गरज आणि महत्त्व उपक्रम निवडण्याचे कारण, वेगळेपण आणि उपयुक्तता याबाबतचा तपशील |
|
२.३ उपक्रमाची उद्दिष्टे हा उपक्रम आपण का निवडला आणि त्याचा काय फायदा, कोणाला होणार आहे, कशाप्रकारे
होणार याबाबतचा तपशील. |
|
२.४ उपक्रमाची वैशिष्ट्ये – |
|
२.५ उपक्रमाची अपेक्षित फलनिष्पत्ती |
|
३. |
आपण प्रस्तावित करीत असलेला उपक्रम हा नवीन असावा. |
४. |
विषयनिहाय अभ्यासक्रमातील नेहमीच्या वेळापत्रकात समाविष्ट असलेले अध्ययन, अध्यापन, मूल्यमापनविषयक उपक्रम या
फेलोशिपमध्ये अपेक्षित नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी. |
फेलोशिपच्या
अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक
१. |
फेलोशिपची घोषणा |
२० ऑगस्ट २०२३ |
२. |
ऑनलाइन फॉर्म सबमिशन |
२० ऑगस्ट २०२३ ते २० ऑक्टोबर २०२३ |
३. |
अर्जाची छाननी आणि निकालाची तयारी |
२१ ऑक्टोबर २०२३ ते २१ नोव्हेंबर २०२३ |
४. |
निकालाची घोषणा |
२६ नोव्हेंबर २०२३ |
५. |
फेलोशिप प्रदान सोहळा कार्यक्रम |
रविवार १० डिसेंबर २०२३ |
फेलोशिपचा कालखंड – मे २०२४
ते मे २०२५
१. |
प्रथम कार्यशाळा |
२७, २८, २९ मे २०२४ |
२. |
प्रकल्पाना भेटी |
१५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२४ |
३. |
द्वितीय कार्यशाळा |
८, ९, १०, नोव्हेंबर २०२४ |
४. |
तृतीय कार्यशाळा व प्रकल्प अहवालाचे
सादरीकरण |
२६, २७, २८ मे २०२५ |
निवड प्रक्रिया
१)
तज्ज्ञ समितीकडून अर्जांची छाननी पूर्ण करण्यात येईल.
२)
पात्रतेचे निकष अधिक गुणवत्तेने पूर्ण करणाऱ्या मोजक्याच शिक्षकांची
तज्ज्ञांतर्फे (आवश्यकतेनुसार शाळाभेटीसह) प्रत्यक्ष/ दूरस्थ मुलाखतींसाठी निवड
करण्यात येईल.
३)
मुलाखत शक्यतो इच्छुक शिक्षकांनी अर्जासोबत पाठविलेल्या टिपणावर आधारित
असेल.
४)
मुलाखतीच्या गुणवत्तेच्या मूल्यमापनानुसार फेलोशिपसाठी ३० शिक्षकांची (१५
प्राथमिक आणि १५ माध्यमिक शिक्षक) निवड करण्यात येईल.
५)
निवड झालेल्या शिक्षकांशी संपर्क साधून त्यांची फेलोशिप स्वीकारण्याविषयीची
लेखी अनुमती घेण्यात येईल.
६) आवश्यकतेनुसार त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचीही
सहसंमती घेण्यात येईल.
पूर्वतयारी:
मे २०२४ ते मे २०२५ या कालावधीत खालील गोष्टी करण्यात येतील:
१)
निवड झालेल्या फेलोजचे किमान ३ दिवसांचे प्रशिक्षण शिबीर.
२)
फेलोने हाती घ्यावयाच्या उपक्रमांचे सादरीकरण व चर्चेअंती निश्चिती,फेलोच्या नियोजित उपक्रमांचे व
त्यांच्या मूल्यमापनाचे नियोजन, संसाधनांची जुळवाजुळव तसेच
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड, पालकांची
अनुमती, मासिक व अंतिम प्रकल्प-अहवालांची रूपरेषा, इ.
३) गट निहाय मेंटर्स नेमेणे.
फेलोशिपमधील उपक्रमाचा कालावधी:
१) मे २०२४ ते मे २०२५ असेल.
२) या कालावधीत फेलोजनी वर निश्चित केलेले उपक्रम करून त्यांचे मासिक अहवाल
प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला देणे अनिवार्य राहील.
३)
एप्रिल २०२५ मध्ये फेलोजनी सविस्तर अहवाल लेखन करून संयोजकांकडे पाठविणे
अपेक्षित आहे.( हार्ड आणि सॉफ्ट कॉपी)
फेलोशिप सांगता शिबीर:
१)
मे २०२५ मध्ये २ दिवसांचे सांगता शिबीर आयोजित करण्यात येईल.
२)
या शिबिरामध्ये सर्व फेलोज् चे त्यांच्या मार्गदर्शकांच्या उपस्थितीत
सादरीकरण होईल व त्यावर इतर तज्ज्ञांबरोबर चर्चाही होतील. त्यात फेलोशिपनंतर
शैक्षणिक परिवर्तनाच्या प्रयत्नांचे सातत्य राखण्याविषयी सूचना देण्यात येतील.
३)
प्रशस्तीपत्रांचे वितरण व फेलोज् नी केलेल्या उपक्रमांचे फेलोशिप पोर्टलवर
प्रकाशन करण्यात येईल. पुढे पोर्टलला योग्य ती प्रसिद्धी देऊन राज्यातील विशेषत:
विद्यार्थी, पालक व
शिक्षकांपर्यंत ते उपक्रम पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
४) या पोर्टलवर फेलोज् चे ब्लॉग्ज, इतर शिक्षकांचे प्रतिसाद, सूचना, प्रश्नांना उत्तरे, इ.
सेवा सुरू करता येतील. उत्तरोत्तर या पोर्टलवर अशा उपक्रमांची महासूची तयार होईल व
शैक्षणिक परिवर्तन करू इच्छिणाऱ्या शेकडो शिक्षकांना ती मार्गदर्शक व स्फूर्तीदायक
ठरेल.
फेलोशिपचे
तपशील
फेलोशिपसाठी
वयोमर्यादा |
वय
वर्षे ४५ किंवा त्यापेक्षा कमी वय असणारे पूर्णवेळ शिक्षक |
फेलोशिपचा
कालावधी |
मे २०२४
ते मे २०२५ |
फेलोशिपसाठी
पात्रता |
१. परिशिष्टामध्ये अंतर्भूत केलेल्या उद्दिष्टांशी
सुसंगत, नियमित अध्यापन करत
विद्यार्थ्यांच्या सहभागाने चालणारे व २. वर्षभर विकसित होत जातील असे अभ्यासक्रमेतर व
वेळापत्रकेतर उपक्रम करत असलेले/ करू इच्छिणारे शिक्षक अर्ज करण्यासाठी पात्र
समजण्यात येतील. तसेच २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात बदली न होणाऱ्या शिक्षकानी
अर्ज करावा. |
फेलोशिपची
संख्या |
२०
प्राथमिक आणि १० माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक एकूण ३०. आणि बी एड च्या द्वितीय वर्षातील १० विद्यार्थी
असतील. त्यासाठीची निवड प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया वेगळी असेल |
अर्जदारांचे
कार्यक्षेत्र |
महाराष्ट्र
असेल |
फेलोशिपची
रक्कम |
निवड
झालेल्या प्रत्येक शिक्षकास वार्षिक ६०,०००/- (रुपये साठ हजार फक्त). यातील ६०% रक्कम शिक्षकाना प्रत्यक्षात
फेलोशिपमधील उपक्रमांसाठी लागणारी साधने, संभाव्य प्रवास,
इत्यादीसाठी देण्यात येईल आणि उर्वरित ४० % रक्कम ही कार्यशाळा
आणि मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनासाठी खर्च करण्यात येईल. |
अर्ज
प्रक्रिया
१.
इच्छुक शिक्षकांनी दिनांक २०
ऑक्टोबर २०२३ अखेर https://apply.sharadpawarfellowship.com या संकेत
स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
२.
अर्जदारांनी फेलोशिपसाठी हाती घेत असलेल्या “शैक्षणिक परिवर्तन उपक्रमा” विषयी खालील
मुद्दयांच्या आधारे सुमारे १००० शब्दांमध्ये (मराठी किंवा इंग्रजी भाषेत)
अर्जामध्ये दिलेल्या जागेत लिहावे.
२.१
उपक्रमाचे शीर्षक
२.२ उपक्रमाची गरज, उपक्रम आपण का निवडला
२.३ उपक्रमाचे महत्व
२.४ उपक्रमाचे नाविन्य व वेगळेपण - शासकीय योजनेपेक्षा वेगळे परंतु शासकीय
योजनांना पूरक
२.५ आपण यापूर्वी काही नवोपक्रम केले आहेत काय ?
२.६ यापूर्वी शासनास किवां इतर संस्थेस आपण काही
नवोपक्रम सदर केले आहेत काय ?
२.७ आपल्या नवोपक्रमाची दखल घेतली गेली आहे काय ?
असल्यास
कोणत्या स्तरापर्यंत
जिल्हास्तर
राज्यस्तर
राष्ट्रीयस्तर
२.८
उपक्रमासाठी लागणारी साधने व सोयी
२.९ आपला उपक्रम साधारण किती दिवस चालेल ?
३.० आपल्या उपक्रमाचे स्थूल वेळापत्रक
३.१ उपक्रमाची फलनिष्पत्ती पाहण्यासाठीची
व्यवस्था
३.४ उपक्रमासाठीचे अंदाजपत्रक
३.५ उपक्रमासाठीचे वेळापत्रक
४ . आपण प्रस्तावित करत
असलेला उपक्रम पूर्वीपासून राबवत असाल तर त्याचा तपशील (छायाचित्र, चित्रफित, परखड मूल्यमापन इ. अर्जासोबत जोडावे.
५ . विषयनिहाय
अभ्यासक्रमातील नेहमीच्या वेळापत्रकात समाविष्ट असलेले अध्ययन, अध्यापन, मूल्यमापनविषयक उपक्रम या फेलोशिपमध्ये
अपेक्षित नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.
प्रतिज्ञा पत्र : मी हा उपक्रम यापूर्वी कोणत्याही खाजगी/शासकीय किंवा निमशासकीय संस्थेस सादर केला नाही.
शिक्षण
फेलोशिप वेळापत्रक
१. |
अर्ज
करण्याची अंतिम मुदत |
२०
ऑक्टोबर २०२३ |
२. |
अर्जाची
छाननी आणि निवड प्रक्रिया |
२१
ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२३ |
३. |
निवड
झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर करणे |
२६
नोव्हेंबर २०२३ |
४. |
फेलोशिप प्रदान
सोहळा आणि नवीन फेलो व जूने फेलो यांचा एकत्रित परिचय आणि संवाद |
१०
डिसेंबर २०२३ |
५. |
प्रथम
कार्यशाळा |
२७, २८, २९ मे
२०२४ |
६. |
प्रकल्पांना
भेटी |
१५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२४ |
७. |
द्वितीय कार्यशाळा |
८, ९, १०
नोव्हेंबर २०२४ |
८. |
तृतीय कार्यशाळा व प्रकल्प अहवालाचे सादरीकरण
|
२६, २७, २८ मे २०२५ |
योगेश कुदळे संजना
पवार
शिक्षण विभाग प्रमुख सहाय्यक, शिक्षण विभाग
यशवंतराव चव्हाण सेंटर, संपर्क – 8291416216
जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१
ई-मेल आयडी – education@chavancentre.org
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments