महाज्योती MHT-CET/JEE/NEET - 2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षण अर्ज (ऑनलाइन प्रशिक्षण व विद्यार्थ्यांना मोफत टॅब व सहा जीबी पर डे इंटरनेट डाटा)

 महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर द्वारा महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना MHT-CET/JEE/NEET - 2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहे सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व सहा जीबी पर डे इंटरनेट डेटा पुरवण्यात येतो.

अर्ज करण्यासाठी आपण पुढील लिंकचा वापर करू शकता.

https://mahajyoti.org.in/en/mht-cet-jee-neet-2025-


डायरेक्ट रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक.

https://neet.mahajyoti.org.in/2023/mobile_verification.php


. योजनेच्या लाभासाठी पात्रता:


1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती- भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.


3. विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.


4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते विद्यार्थ्या अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 11 वी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट) व 10 वी ची गुणपत्रिका जोडावी.


ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:


1. 10 वी ची गुणपत्रिका


2. 11 विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचे प्रवेशपत्र (बोनाफाईट सर्टिफिकेट)


3. आधार कार्ड


4. जातीचे प्रमाणपत्र


5. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र


क. अर्ज कसा करावा.


1. महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील "Application for MHT-CET/JEE/NEET 2025 Training" यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.


2. अर्जासोबत व' मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.


ड. अटी व शर्ती :


1. अर्ज करण्याचा अंतिम दि.31/08/2023 आहे. 2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.


3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.


4. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संर्पक क्र 0712-2870120/21

E-mail Id: mahajyotijeeneet24@gmail.com


(राजेश खवले)

व्यवस्थापकीय संचालक,

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर




संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.