बदली अपडेट 2023 - आंतरजिल्हा बदली संदर्भात ग्रामविकास विभागाचा आज दिनांक 23 ऑगस्ट 2023 चा शासन निर्णय

 आज दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


दि.०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारीत धोरण विहीत करण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांसाठी सन २०२२ ची आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबविण्यात आलेली आहे. तसेच दि.२३.०५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे.


३. तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्र. ३ येथील दि.२१.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १ मध्ये सन २०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी, असे नमूद केले आहे.


सदर मुद्द्याच्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.


1) सन २०२२ मधील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविताना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळणेसाठी पात्र ठरले होते, तथापि रिक्त जागा नसल्याने ज्यांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांची यादी संबंधित जिल्हा परिषदांनी Vinsys IT Services (I) Pvt. Ltd, Pune कडून प्राप्त करुन घ्यावी.


(ii) सदर यादीमधील शिक्षकांची दि.२३.०५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील मागदर्शक सूचना व संवर्गनिहाय प्राधान्यक्रमानुसार सुधारित यादी तयार करण्यात यावी. सन २०२२ मधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून काही न्यायालयीन / लोकायुक्त / अन्य न्यायाधिकरण / सक्षम प्राधिकरण यांचे स्वयंस्पष्ट आदेश असल्यास त्या आदेशाची प्रत उपलब्ध करून घेण्यात यावी. अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी तयार करावयाच्या यादीमध्ये प्राथम्य देण्यात यावे.


iii) आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छूक शिक्षकांनी नमूद केलेल्या पर्यायानुसार संबंधित जिल्हा परिषदांमध्ये रिक्तता असल्यास अशा शिक्षकांची तात्काळ बदली करण्यात यावी. ज्या जिल्हा परिषदांमध्ये सद्यस्थितीत प्रवर्गनिहाय रिक्त पदे नसतील, अशा ठिकाणी संबंधित जिल्हा परिषदांनी परस्पर समन्वयाने त्या त्या प्रवर्गामध्ये रिक्त पदे उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने संबंधित शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करावी.


iv) आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर जिल्ह्यातील रिक्त जागा विचारात घेवून ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि.२३.०५.२०२३ मधील मुद्दा क्र. १३ व १४ नुसार आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात यावी.


(v) आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत शा.नि. दि.२३.०५.२०२३ मधील २.८ मध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट या वर्षीच्या बदलीकरिता शिथिल करण्यात यावी.


उपरोक्त निर्देशानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.


(पो.द. देशमुख)


उपसचिव, महाराष्ट्र शासन







वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खाली Download वर क्लिक करा.

Download


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.