जिल्हा परिषद पदभरती 2023 मध्ये विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी सरळ सेवा भरती द्वारे जाहिरात निघाली आहे वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये एकूण 81 जागा विस्तार अधिकारी शिक्षण या पदाच्या आहेत.
आपल्या अनेक शिक्षक बांधवांनी मेसेज द्वारे किंवा फोन करून विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी कमाल वयोमर्यादा किती याबाबत चौकशी केली आहे.
व काही शिक्षकांनी शैक्षणिक व्यावसायिक अहर्ता व अनुभव याबाबत देखील विचारणा केली आहे सबब याबाबत पुढील प्रमाणे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 3 मार्च 2023 रोजी शासन सेवेत नियुक्तीच्या कमाल वयोमर्यादित 31 डिसेंबर 2023 पर्यंत दोन वर्षे इतकी शितल दिलेली आहे.
यामुळे खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष असलेली कमाल वयोमर्यादा शिथिल करून खुल्या प्रवर्गासाठी चाळीस वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आरक्षणा नुसार वयोमर्यादा आपल्याला पुढील तक्त्यात दिसून येईल.
अभ्यासक्रम
विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी पंधरा प्रश्न म्हणजेच 30 गुणासाठी मराठी विषयावर प्रश्न विचारले जातील.
पंधरा प्रश्न म्हणजेच 30 गुणांसाठी इंग्रजी या विषयावर प्रश्न विचारले जातील.
पंधरा प्रश्न 30 गुणांसाठी सामान्य ज्ञान या घटकावर प्रश्न विचारले जातील.
पंधरा प्रश्न 30 गुणांसाठी या घटकावर प्रश्न विचारले जातील.
तर सर्वात जास्त भारांश म्हणजेच 40 प्रश्न 80 गुणांसाठी शिक्षण शास्त्र या विषयावर प्रश्न विचारले जातील.
विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी बी ए बी एस सी बीकॉम किंवा समतुल्य पदवी 50 टक्के गुणांसह सोबतच व्यावसायिक अहर्ता म्हणून बी एड 50% गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
बीएड ही व्यावसायिक अहर्ता पूर्ण केल्यानंतर तीन वर्षाचा मान्यता प्राप्त प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक किंवा अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकारणे वैयक्तिक मान्यता दिलेला अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव उमेदवारास असणे आवश्यक आहे.
म्हणजेच खाजगी किंवा इतर कोणत्याही अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेवर बीएड पात्रता धारण केल्यानंतर तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अधिक सविस्तर माहितीसाठी आपल्या जिल्ह्याची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments