शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार सन 2022 23 साठी DNO HOI INO व विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन करणेबाबत पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहे.
एन. एस. पी. पोर्टल वरील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यासाठी असलेली मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना व अल्पसंख्यांक समाजातील गुणवंत मुलांसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती या योजनांचे Biometric Authentification करणंबाबत वेळोवळी आयोजित व्ही.सी. द्वारे राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक व योजना) व प्रधान सल्लागार सी. एस. सी. (ई-गव्ह) तसेच सी. एस. सी. सेंटरचे जिल्हा प्रतिनीधी यांना सूचना दिलेल्या आहेत. दिनांक १४.०८ २०२३ रोजी केंद्र शासन, अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या (एमओएमए) स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या व्ही.सी. मध्ये खालील प्रमाणे कार्यसूची तसेच निर्देश देण्यात आलेले आहे.
त्यानुसार केंद्र शासनाने विहित केलेल्या वेळापत्रकानुसार कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे. जिल्हा नोडल अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त जिल्हयातील सर्व मुख्याध्यापक (HOI) INO यांचे बायो-मैट्रोक प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे किंवा नाही याचा आढावा घेणे, मुख्याध्यापक (HOI), INO यांचे बायोमॅट्रीक प्रमाणीकरण पूर्ण झाल्याशिवाय विद्याथ्र्यांचे बायोमॅट्रीक प्रमाणीकरण होणार नाही. विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहील्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, शाळेतील विद्यार्थ्यांचे बायो- मैट्रीक प्रमाणीकरण करताना प्रिमॅट्रीक शिष्यवृत्ती योजना ही इयत्ता ९ वी व इयत्ता १० मधील पात्र विद्यार्थ्यासाठी व अल्पसंख्यांक समाजातील गुणवंत मुलीसाठी वेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती ही अल्पसंख्याक (मुस्लीम, ख्रिशन, शीख, बौध्द, पारसी व जैन समाजातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या मुलीसाठी आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांचे बायोमॅट्रीक प्रमाणीकरण करताना विद्याथ्र्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
शाळेतील विद्यार्थ्यांचे बायोमॅट्रीक प्रमाणीकरण करतांना मुख्याध्यापक (HOI), INO व सी.एस.सी. सेंटरचे प्रतिनिधी यांचा समक्ष करावयाची दक्षता घ्यावी. सदर कार्यवाही करताना सन २०२२-२३ मध्ये प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती व बेगम हजरत महल शिष्यवृत्ती मध्ये अंतिम पडताळणी अंत पात्र असलेल्या विदयार्थ्याचे बायोमॅट्रीक प्रमाणीकरण करावे. विद्याथ्र्यांचे बायोमॅट्रीक प्रमाणीकरण करण्याकरीता शिविर आयोजित करून आवश्यक असणारे कागदपत्रांची यादी सह उपस्थित राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना द्याव्यात.
उक्त दोन्ही योजनेसाठी सन २०२२-२३ मध्ये निकष पात्र असणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी व विद्याथींनी अन्य ठिकाणी शिक्षण घेत असल्यास / नसल्यास त्यांना बायोमॅट्रीक प्रमाणीकरणासाठी पोर्टल सुरू आहे किंवा कसे याबाबत खात्री करूनच उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावे.
जिल्हा नोडल अधिकारी यानी त्यांच्या जिल्हयाच्या व्हॉटस अॅप ग्रुप वर वेळोवेळी अदयावत माहिती टाकण्यात यावी.
केंद्र शासन स्तरावरून निर्देशित करण्यात आलेले वेळापत्रक जिल्हयातील सर्व शाळांना देण्यात आलेले आहे काय, दिले नसल्यास तात्काळ निदर्शनास आणावे. एन एस पी पोर्टलवरील नोंदणीकृत संस्थेची यादी शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या जिल्हयातील सर्व एच.ओ. आय (HOI) ज्यांना वितरीत केली आहे किंवा कसे आपल्या अधिनस्त जिल्हयातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक (HDI) IND यांनी विद्यार्थ्याचे बायोमॅट्रीक प्रमाणीकरण करण्याबाबत शाळेमध्ये शिबिर आयोजित करण्याचे नियोजन करावे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक (योजना) यानी एन. एस. पी. पोर्टल वरील HOI/ INO प्रत्यक्षात तेच शाळेमध्ये कार्यरत आहे किंवा कसे याचीही आपण स्वतः तपासणी करावी.
करीता उपरोक्त प्रमाणे प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती आणि बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे जिल्हा नोडल अधिकारी (DNO) आहेत. सी.एस.सी चे जिल्हा मैनेजर यांच्याशी संपर्क साधून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यानी वायोमॅट्रीक प्रमाणीकरणाची कार्यवाही पूर्ण करण्याकरीता केंद्र शासनाच्या स्तरावर देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून कार्यवाही हो कालमर्यादीत असल्याने विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर प्रकरणी विलंब झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक
(योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे १
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments