यु-डायस प्लस सन २०२१-२२ व २०२२-२३ ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदविलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची माहितीतील तफावतीबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईने दिनांक 21 जुलै 2023 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षातील नोंदविलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत पुढील प्रमाणे तफावत दिसून आली आहे.
विद्यार्थ्यांची नोंद यु-डायस प्लस प्रणालीमध्ये करणेबाबत या कार्यालयाकडून वारंवार पत्र व्यवहार केला असून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. तरी देखील अद्याप विद्यार्थ्यांची नोंद १००% पूर्ण झालेली नाही. सदर बाब अत्यंत गंभीर असून याचा परिणाम पुढील वर्षाच्या समग्र शिक्षा योजनेच्या वार्षिक नियोजन व अंदाज पत्रकावर होईल.
तरी आपणास कळविण्यात येते की, शाळानिहाय विद्यार्थी संख्येची खात्री करून राहिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंद करावी, जेणे करून एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. सोबत जिल्हानिहाय तुलनात्मक अहवाल.
(सरोज जगताप)
सहा. संचालक (कार्यक्रम/प्रशा.)
म.प्रा.शि.प., मुंबई.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments