दिनांक 21 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने सरळ सेवा भरती 2023 तलाठी संवर्ग अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दि. 26/06/2023 पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्विकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमुद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क भरण्याकामी दिनांक 18/07/2023 रोजी 23.55 वा. पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
तथापि राज्यात सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट सेवा प्रभावित झाल्याने दुर्गम भागातील (PESA क्षेत्रातील) व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण झाल्याबाबत निवेदन शासन स्तरावर प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे तलाठी भरतीकामी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क जमा करण्याकामी पुढीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी
दि. 22/07/2023 रोजी रात्री 00.05 वा. पासून
दि. 25/07/2023 रोजी रात्री 23.55 वा. पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक विहीत कालावधी
दि. 25/07/2023 रोजी रात्री 23.55 वा. पर्यंत
तलाठी भरती कामी यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच वरीलप्रमाणे दिलेली मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही.
स्वा. /- xxx (आनंद रायते) भा.प्र.से.
राज्य परिक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख, पुणे
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments