राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयातून आज दिनांक 31 जुलै 2023 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार राज्यस्तरीय न उपक्रम स्पर्धा सन 2023 24 साठी नवोपक्रम हाती घेण्यासंदर्भातील निवेदनाबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व शैक्षणिक स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ चे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करीत असतात..
नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व सृजनशील विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी राज्यात सुरु असून शिक्षण प्रक्रियेत होणारे बदल, राष्ट्रीय व राज्य स्तरावरून सुरु असलेले विविध उपक्रम यांची अंमलबजावणी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या पूर्तीसाठी केली जाते. तदनुषंगाने सन २०२३ २४ मध्ये घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेकरिता स्पर्धकांनी शाळा तसेच यंत्रणेतील समस्या/ आव्हाने यावर आधारित नवोपक्रम, शिक्षक, विद्यार्थी व पालक केंद्रित नवोपक्रम तसेच शाळेच्या एकूणच शैक्षणिक व भौतिक गुणवत्ता वाढीसाठी नवोपक्रम हाती घेऊन, अशा प्रकारचे नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर करण्यावर भर देण्यात यावा. तरी आपले स्तरावरून याबाबत सर्व शिक्षक व अधिकारी यांना प्रेरित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
सन २०२२-२३ मध्ये संपन्न झालेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील गुणानुक्रमांक प्राप्त झालेले नवोपक्रम अहवाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या संकेतस्थळावर (https://maa.ac.in) प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे या शैक्षणिक वर्षीदेखील गुणानुक्रमांक प्राप्त नवोपक्रमांना प्रसिद्धी देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ साठी नवोपक्रम सादर करण्याकरिता ऑक्टोबर २०२३ मध्ये स्वतंत्रपणे लिंक व माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल.
(डॉ. कमलादेवी आवटे)
उपसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments