डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग ) राबविण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी प्रवेश परीक्षेचा ऑनलाईन अर्ज, परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची माहिती इ. ची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी
या संकेतस्थळास भेट द्यावी.
प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज
दि. १४ जुलै २०२३ (पासून)
अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक
दि. १४ ऑगस्ट २०२३ (पर्यंत)
लेखी प्रवेश परीक्षा दिनांक
दि. २७ ऑगस्ट २०२३
दिल्ली येथील युपीएससी परीक्षेच्या पूर्व तयारी प्रशिक्षणासाठी अनुसूचित जातीच्या ३०० उमेदवारांची निवड करण्यात येईल. त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी, ४ टक्के जागा "दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी (Person With Disability), ५% जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील (वाल्मिकी व तत्सम जाती- होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी इ.) विद्यार्थ्यांकरिता आरक्षित असतील, एकूण जागांच्या ५% जागा विशेष बाब म्हणून राखीव ठेवण्यात येईल.
पात्रता :-
१) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
२) उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.
३) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
४) उमेदवाराचे वय संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेच्या अटी व शर्ती नुसार असावे.
५) संघ लोकसेवा आयोगामार्फत सन २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी पात्र असावा. ६) रु. ८ लाखापर्यंत कौटुंबिक उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतील.
प्रशिक्षणा दरम्यान देण्यात येणारे लाभाचे स्वरूप :-
१) बार्टी संस्थेमार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षण शुल्क देण्यात येते.
२) सदर प्रशिक्षण अनिवासी असल्याने उमेदवारांना दिल्ली येथील निवास व भोजनाची व्यवस्थेकरिता प्रती माह कमाल रक्कम रु.१३०००/- विद्यावेतन देण्यात येते. विद्यावेतन करिता विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात येईल.
३) प्रशिक्षणाच्या सुरवातीस दिल्ली येथे जाण्याकरिता रु. ५०००/-(एकदा) व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या
प्रवासाकरिता रु. ५०००/- (एकदा) प्रवास खर्च देण्यात येतो.
(४) पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य रु. ३०००/- (एकरकमी)
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments