शालार्थ वाढीव महागाई भत्ता व थकबाकी जुलै 2023 अपडेट.

शालार्थ अपडेट


 1. 30 जून 2023 च्या GR नुसार, शालार्थ ऍप्लिकेशनमध्ये 7वे वेतन आणि 6वे वेतन डीए दर अपडेट केले आहेत.



 2. सर्व लागू कर्मचार्‍यांसाठी डीए थकबाकी टॅब प्रदान केला आहे, डीडीओने संबंधित डीडीओ आणि कर्मचार्‍यांसाठी डीए थकबाकी पात्रता देणे आवश्यक आहे.

 डीए थकबाकी प्रणालीमध्ये प्रवेश करताना लागू डीए थकबाकी फरकानुसार प्रविष्ट केलेली डीए थकबाकी रक्कम प्रमाणित केली पाहिजे


-- शालार्थ महाआयटी टीम


 माहे जुलै 2023 च्या मासिक वेतन देयकामध्ये खालील प्रमाणे दिलेल्या सुचनेनुसार कार्यवाही करावी.


2. सदर्भिय पत्र अन्वये दि. 01 जानेवारी 2023 पासून 42 टक्के प्रमाणे महागाई भत्याच्या दरात सुधारणा केल्यामुळे दिनांक 01 जानेवारी 2023 ते दि. 30 जुन 2023 या एकूण 6 महिन्यांच्या कालावधीतील 4% ( महागाई भत्ता 42% 38% ) वाढीव महागाई भत्ता थकबाकीची रक्कम माहे जुलै 2023 च्या मासिक वेतन देयकामध्ये रोखीने काढण्यात यावी. तसेच प्रत्येक कर्मचारीनिहाय 4% महागाई भत्त्याचे विवरणपत्र (DA ARREARS STATEMENT) आवश्यक पणे जोडावे. तसेच महागाई भत्याच्या थकबाकीच्या विवरणपत्रामधील रक्कम व वेतन देयकातील Inner Page मधील थकबाकीची रक्कम हि एकसारखी असावी. अन्यथा वेतन देयक स्विकारण्यात येणार नाही.


2) जे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी NPS ची वर्गणी कपात करत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या 4% DA ARREARS मथुन 10 % वर्गणी कपात करण्यात यावी. तसेच कपात केलेली रक्कम व वेतन देयकातील Inner Page मधील रक्कम हि एकसारखी असावी, कपात न केल्यास देयके स्विकारण्यात येणार नाही.


3) माहे जुलै 2023 च्या वेतन देयकासोबत जुलै 2023 च्या वेतन वाढीची वेतनवाढ प्रमाणपत्र (Annual Increment Certificate) संलग्न करावे. 4) शालार्थ प्रणालीतून जनरेट होणारे Change Statement माहे जुलै 2023 चे मासिक वेतन देयका सोबत संलग्न करावे.


5) माहे जुलै 2023 च्या वेतन देयकासोबत मुख्याध्यापकाचे शाळेमधील कार्यरत सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचान्यांची ( ज्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ जुलै मध्ये येते) वार्षिक वेतनवाढ वेतन देयकामध्ये मंजूर केलेली आहे याबाबतचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेल्या नमुन्यात सादर करावे. 6) सुचनेसोबत उपलब्ध करून दिलेल्या नमुन्यामध्येच 4% वाढीव महागाई भत्त्याचे विवरणपत्र दि. 01.01.2023 ते दि. 30.06.2023 पर्यंतचे देयकासोबत सादर करावे.


7) माहे जुलै 2023 ची वेतन देयक दि. 17.07.2023 पर्यंत कुठल्याही परिस्थिमीमध्ये सादर करावे.

वेतन अधिक्षक गोंदिया.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.