शाळा सुरू होताना या अगोदर फक्त एका गणवेशासाठी राज्य शासनाकडून निधी वितरित करण्यात आला होता. आता दुसऱ्या गणवेशासाठी देखील निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यस्तरावरून जिल्हास्तरावर निधी वितरित झाला आहे तो जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर काही जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दुसरा गणवेश खरेदी प्रक्रिया कशा पद्धतीने राबवावी याबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच सदर अटी व शर्ती लेखी पत्राद्वारे संबंधीत लाभार्थी शाळांना कळविण्यात याव्यात. ' नमूद प्रमाणे प्रस्तावित एक गणवेश वितरणाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन
१) निर्णय क्रमांक एसएसए / १२२०/प्रक्र.क्र.१५४/एसडी-३ दि. ०८/०६/२०२३ मधील मार्गदर्शक सुचनेप्रमाणे शाळामधील विद्यार्थ्यांना एक गणवेश स्काऊट व गाईड या विषयास अनुरुप (मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हापपैंट / पँट तसेच मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळामधील सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची) शाळा व्यवस्थापन समिती मार्फत देण्यात यावा. प्रस्तुत गणवेशाबाबतची सर्वसाधारण रचना सोबत परिशिष्ट अ मध्ये जोडली आहे. तसेच विद्याथ्र्यांच्या शर्ट वरती शोल्डर स्ट्रीप ( Shoulder Stripes) व दोन खिसे (Double Pocket ) असणे आवश्यक आहे. स्काऊट व गाईड विषयासाठी आवश्यक असणाऱ्या गणवेशामधील टोपी व स्कार्प याबाबत वेगळ्याने आदेश निर्गमित करण्यात येतील. मार्गदर्शक सुचना शासन निर्णयाची प्रत परिशिष्ट अ सह सदर आदेशासोबत जोडण्यात येत आहे. सदर मोफत गणवेश योजनेच्या संपूर्ण सूचना लाभार्थी शाळेपर्यंत आपल्या स्तरावरुन लेखी स्वरुपात देण्यात याव्यात. व
२) स्काऊट व गाईड विषयाच्या तासिका आठवडयातून दोन दिवस असतात त्यापैकी एक तासिका शक्यतो शनिवारी असते त्यामुळे मंगळवार, गुरुवार व शनिवार या तिन दिवशी स्काऊट व गाईड विषयास अनुरूप उपलब्ध करुन देण्यात येणारा गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे आवश्यक राहील. तसेच सोमवार, बुधवार व शुक्रवार या तिन दिवशी शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या रंगाचा गणवेश परिधान करण्यात यावा.
३) पुढील शैक्षणिक वर्षापासुन म्हणजेच सन २०२४-२५ पासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला व बचत गटांमार्फत शिलाई करुन एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये मोफत गणवेश योजनेबाबत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करु नये याबाबतच्या आवश्यक त्या सविस्तर सुचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.
४) संदर्भ क्र. २ नुसार शासन निर्णयामध्ये नमूद सविस्तर सुचनेप्रमाणे स्काऊट व गाईड विषयास अनुरुप गणवेश वितरणाची कार्यवाही परिशिष्ट अ नुसार करण्यात यावी. परिशिष्ट अ पत्रासोबत जोडण्यात आले आहे. तसेच सदर विषयाच्या मार्गदर्शक सुचना, शासन निर्णयाची प्रत व परिशिष्ट अ शाळा स्तरापर्यंत लेखी स्वरुपात वितरीत करणेबाबत गशिअ यांना निर्देशित करण्यात येत आहे.
५) सदर योजनेच्या लाभापासुन गणवेश पात्र लाभार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी ६) शाळा व्यवस्थापन समित्यांना अनुदान वितरणास विलंब होऊ नये म्हणून सदरचे अनुदान जिल्हास्तरावरुन थेट तालुका स्तरावर PFMS प्रणालीच्या माध्यमातून वितरीत करण्यात यावे व शाळा व्यवस्थापन समित्यांनी गणवेश वितरणाची कार्यवाही विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन गणवेश खरेदी करावे व देयकाची अदायगी करण्याकरीता संबंधित प्रमाणके व उपप्रमाणके तालुका स्तरावर सादर करावे.
७) राज्य शासनाचे सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्यांक विभागामार्फत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी गणवेश अथवा शासनमान्य वसतीगृहातील विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जात असल्यास अशा लाभार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येऊ नये. एकाच विद्यार्थ्यास दुबार गणवेशाचा लाभ अनुज्ञेय होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी.
८) प्रत्येक शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन वरिल मार्गदर्शक सुचनेप्रमाणे त्यांच्या शाळेतील गणवेश पात्र लाभार्थ्याच्या वयोगटानुसार व विद्यार्थ्याच्या मापानुसार (Size प्रमाणे) मुलांसाठी आणि मुलींसाठी गणवेश खरेदी करुन वितरीत करावे. ९) गणवेश शिलाई पक्क्या धाग्याची असावी. शिलाई निघाल्यास गणवेशाचे कापड फाटल्यास अथवा गणवेशाबाबत कोणतीही तक्रार उपस्थित झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची राहील.
१०) प्रस्तावित प्रमाणे प्रती लाभार्थी एक गणवेश संचाकरीता रु. ३००/- तरतुदीपेक्षा अधिकचा खर्च होणार नाही याची दक्षता देखिल संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने घेणे आवश्यक आहे. रु.३००/- तरतुदीपेक्षा जादा खर्च झाल्यास जादा झालेला खर्च मान्य केला जाणार नाही.
११) प्रत्येक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेला गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सुचना दयाव्यात व गटशिक्षणाधिकारी व पं.स. स्तरावरील पर्यवेक्षकीय यंत्रणेनी त्यांच्या गटातील संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश वितरणाबाबत योग्य मार्गदर्शन करावे.
१२) गणवेश खरेदी देयकांची अदायगी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने PFMS प्रणालीच्या माध्यमातून करावी. गणवेश पुरवठादारास रोखीने अदायगी करु नये. अदायगी केल्याबाबतचे अभिलेखे, संपूर्ण हिशोबाच्या अचूक नोंदी तसेच ऐवज जतन करून ठेवावेत. लेखा परिक्षणावेळेस लेखा परिक्षकास संपूर्ण दिनांकासह हिशोबाची माहिती व अभिलेखे उपलब्ध करुन देता येतील. याप्रमाणे लेखा विषयक बाबीच्या नोंदी ठेवण्यात याव्यात.
१३) शाळास्तरावर स्टॉक रजिष्टर ठेवण्यात यावे. सदर रजिष्टरमध्ये गणवेश वितरणाचा दिनांक व गणवेश मिळाल्याबाबत संबंधित लाभार्थी व त्यांच्या पालकांची स्वाक्षरी/ अंगठयाच्या ठसा घेणे आवश्यक आहे. (१४) गणवेश वितरणाबाबतची कार्यवाही झाल्यानंतर भारत सरकार यांचे प्रबंध पोर्टलवर झालेल्या खर्चाची नोंद तात्काळ करण्यात यावी. मंजुर तरतुदीमधील रक्कम शिल्लक असल्यास, सदरची तरतुद याच वित्तीय वर्षात जिल्हास्तरावर जमा करावी व त्याबाबतची नोंद ठेवण्यात यावी.
१५) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्हयातील सर्व गटांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार त्यांच्या जिल्हयाचा संकलित अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयास व शिक्षण संचालक (प्राथ) शिक्षण संचालनालय पुणे या कार्यालयास ऑगस्ट २०२३ अखेर सादर करावे.
१६) गणवेश वितरणामध्ये विलंब होणार नाही तसेच गणवेश पात्र लाभार्थी सदर योजनेच्या लाभापासुन वंचित राहणार नाहीत याची दक्षता शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, यांनी घेणे आवश्यक आहे.
(१७) प्रस्तावित प्रमाणे गणवेश पात्र सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सुचनेप्रमाणे गणवेश संच वितरीत होणे आवश्यक आहे. याअनुषंगाने योग्य नियोजन करुन उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या तरतुदीचा विनियोग करण्यात यावा.
(१८) सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्याकरीता मार्गदर्शन पत्र क्र. १९१० दि.०६/०७/२०२३ व शासन निर्णय दि.०८/०६/२०२३ मधील स्काऊट व गाईड विषयास अनुरूप गणवेश वितरण कार्यवाही परिशिष्ट अ या आदेशासोबत जोडण्यात येत आहे. सदर मार्गदर्शक सुचना लाभार्थी शाळेपर्यंत लेखी स्वरुपात देण्यात याव्यात.
सदर उपक्रमाची रक्कम मोफत गणवेश या लेखाशिर्षाअंतर्गत सन २०२३ २४ या आर्थिक वर्षातील तरतूदी मधून खर्ची टाकण्यात यावी.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments