महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने दिनांक 20 जुलै 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा-कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने मा. मंत्रीमंडळाने दिनांक ०४.०७.२०२३ रोजी घेतलेल्या निर्णयास अनुसरुन याबाबत सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णय :-
महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी / पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी QS World Ranking मध्ये २०० च्या आत रॅन्कींग असलेल्या शैक्षणिक संस्था / विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेतील अशा मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे ७५ विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
२. सदरची योजना छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था ( सारथी), पुणे या शासनाच्या संस्थेमार्फत "सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना" या नावाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राबविण्यात येईल.
३. या योजनेची व्याप्ती पुढीलप्रमाणे राहील :-
सदर योजना महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या जातीतील विद्यार्थ्यांकरिता लागू राहील. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी संस्थेकडून ऑनलाईन स्वरुपात मागवून घेण्यात येतील.
५. जर एखादा विषय / अभ्यासक्रम करिता आवश्यक त्या प्रमाणात विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर ) त्याच विषयामधील पदव्युत्तर पदवी / पदविका ते पीएचडी या दोन्ही मध्ये आंतरबदल करण्याचे अधिकार निवड समितीला असतील. ) वरील (1) प्रमाणे आंतरबदल करूनही जर एखाद्या विषयाकरिता विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर दुसऱ्या विषयाकरिता मंजूर संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी उपलब्ध होत असतील तर त्याप्रमाणे बदल करण्याचे सर्वाधिकार निवड समितीला राहतील.
ज्या अभ्यासक्रमासाठी जास्त संख्येने विद्यार्थी उपलब्ध होतील त्या विषयासाठी प्राध्यान्य देण्यात येईल.
६. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३० % जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे सर्वाधिकार निवड समितीला राहतील.
या शासन निर्णयासोबतच्या "परिशिष्ट अ" मध्ये परदेशी शिष्यवृत्ती करीता शाखानिहाय मंजूर करण्यात आलेला अभ्यासक्रम नमूद करण्यात आला आहे. तसेच सदर योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता / अपात्रता, मिळणारे लाभ, शिष्यवृत्तीच्या लाभासाठी निवड कार्य पध्दती इत्यादीची
माहिती सोबतच्या परिशिष्ट ब" मध्ये दर्शविण्यात आलेली आहे.
या योजनेसाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात रुपये २५.०० कोटी इतका अतिरिक्त 6.
नियतव्यय सारथी या संस्थेकडे उपलब्ध असलेल्या अखर्चित निधीतून भागविण्यात येणार आहे. ९. सदर शासन निर्णय, मा. मंत्रिमंडळाने दिनांक ०४.०७.२०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०७२०१३३७१३६२१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
VILAS DNYANOBA LAD
(विलास लाड)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
संपूर्ण शासन निर्णय परिशिष्टांसह पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments