महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 25 जुलै 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार केंद्रप्रमुख पदोन्नती बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रियेमध्ये विशेष शिक्षक किंवा पदवीधर शिक्षकांच्या विषयानुसार पदोन्नती करणे बाबत जिल्हा परिषद सोलापूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
त्याचे उत्तर ग्रामविकास विभागाने पुढील प्रमाणे दिले आहे.
संदर्भ क्रमांक (४) च्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे. या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की उपरोक्त विषयाबाबत आपल्या संदर्भ क्रमांक (१) या पत्रातील मुद्या क्रमांक ५ चे स्पष्टीकरण संदर्भ क्रमांक (२) च्या पत्रान्वये यापुर्वीच दिले आहे.
केंद्रप्रमुख पदोन्नती करताना शासन अधिसूचना दिनांक १०.०६.२०१४ खंड ४ (एक) अनुसार एकूण मंजूर पदापैकी भाषा, गणित व विज्ञान, सामाजिक शास्त्रे (इतिहास, भूगोल) या विषयासाठी पदांची विभागणी सम प्रमाणात राहील असे स्पष्ट केले आहे. सबब या प्रमाणे पदोन्नतीची प्रक्रीया पूर्ण करावी.
आपला,
(पो) द. देशमुख) उप सचिव, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments