विभागीय उपसंचालक लातूर यांनी दिनांक 19 जुलै 2023 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार जुलै 2023 च्या वेतन देयकासोबत कोणाचीही वेतन वाढ रोखली नाही असे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यासंबंधी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
खाजगी प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचारी यांचे माहे जुलैच्या वेतन देयकासोबत कोणाचीही वेतनवाढ रोखलेली नाही, असे मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यासंबंधीचे संदर्भिय निवेदनाची प्रत या कार्यालयास प्राप्त झालेली आहे.
सदर संदर्भिय निवेदनामध्ये वरील प्रमाणे शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना शासन नियमानुसार प्रतिवर्षी देय असलेली वेतनवाढ लागू केली जाते. मात्र काही शाळेतील मुख्याध्यापक / प्राचार्य व संस्थाचालक हे त्यांच्या मर्जीविरोधातील शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याचे प्रयत्न करत असतात काही ठिकाणी अर्थिक मागणी सुध्दा केली जाते. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांवर होणारा मानसिक व अर्थिक त्रास होणार नाही असे नमूद केलेले आहे. सुलभ संदर्भाकरीता संदर्भिय निवेदनाची प्रत या सोबत आपणाकडे पाठविण्यात येत आहे.
तरी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मुद्यांबाबत शासनाच्या प्रचलित नियमानुसार यथानियम कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधीत निवेदनकर्ते यांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे.
(डॉ. गणपत मोरे)
विभागीय शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग, लातूर.
वरील परिपत्रक जरी लातूर विभागासाठी असले तरी इतर विभागांनी जर वरील प्रमाणे निवेदन दिले तर त्या विभागांची देखील वरील प्रमाणे परिपत्रक निर्गमित होऊ शकतात.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments