संचालक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांनी दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट डॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४ प्रवेशपत्र (HALL TICKET) प्रिंटआऊट काढून केंद्रप्रमुख यांच्या सहीशिक्यानिशी विद्यार्थ्यांना वितरित करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ- १) परिपत्रक क्र. कशिमं/शारेप-२०२४/५७, दिनांक १६.०७.२०२४
२) परिपत्रक क्र. कशिमं/शारेप-२०२४/२३४, दिनांक १४.०८.२०२४
३) कशिमं/शारेप-२०२४/२६५ दि.३०.०८.२०२४
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट डॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४ चे वेळापत्रक तसेच विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी, परीक्षा शुल्क भरणा कालावधी इ. बाबत संदर्भिय पत्र/परिपत्रकानुसार कळविण्यात आले होते.
शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांची नांवनोदणी करताना दोन्हीपैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील (GENERAL REGISTER) नावाप्रमाणे अचूक नांवनोंदणी करण्याबाबत संदर्भिय क्र. १ वरील परिपत्रकानुसार कळविण्यांत आले आहे. तथापी आपल्या केंद्रावर एकाच विद्यार्थ्यांची दोन्ही परीक्षेसाठी नांवनोदणी केली असल्यास दोन्ही परीक्षा एकाच वर्षी देता येत नसल्यामुळे दोन्हीपैकी एका परीक्षेची ऑनलाईन नोंदणी रदद करावी.
एखाद्या विद्यार्थ्यांची एलिमेंटरी ऐवजी इंटरमिजिएट/इंटरमिजिएट ऐवजी एलिमेंटरी परीक्षेकरिता नोंदणी केली असल्यास अशा प्रकरणी योग्य त्या बदलासह ऑनलाईन दुरुस्ती करण्यात यावी. ऑनलाईन नोंदणी केल्याप्रमाणे प्रवेशपत्र निर्गमित होईल, प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यांस परिक्षेस बसण्याची परवानगी देऊ नये. अशा प्रकारचे प्रकरण उद्भवल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी केंद्रप्रमुख यांची राहील.
संदर्भिय क्र. ३ वरील पत्रात नमूद केल्यानुसार दिनांक ३१/८/२०२४ पर्यंत ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (HALL TICKET) दिनांक ०२/९/२०२४ (म.ऊ) पासून केंद्राच्या लॉग-इनवर उपल्ब्ध होतील. सदर प्रवेशपत्र (HALL TICKET) प्रिंटआऊट काढून केंद्रप्रमुख यांच्या सहीशिक्क्यानिशी विद्यार्थ्यांना वितरीत करावीत.
संदर्भिय पत्र / परीपत्रकानुसार परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांची अद्याप ऑनलाईन नांवनोंदणी केली गेली नाही असे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून त्यांची अचूक ऑनलाईन नांव नोंदणी व परीक्षा शुल्क भरणा करण्याकरिता दिनांक ०८/०९/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यांत येत आहे. याबाबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक/कला शिक्षक/विद्यार्थी/पालक यांना अवगत करुन वरील कालावधीत कार्यवाही पूर्ण करावी. त्यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
(विनोद दांडगे)
संचालक,
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ,
मुंबई.
शासकीय रेखाकला परीक्षा २०२४ विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नाव नोंदणीबाबत महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ मुंबई पुणे दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत
शासकीय रेखाकला परीक्षा २०२४ करिता ऑनलाईन नांव नोदणीकरिता सर्व केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक यांना या कार्यालयाच्या संदर्भिय परिपत्रकान्वये कळविण्यांत आले आहे. प्रत सोबत जोडली आहे.
सदर परीक्षेसाठी केंद्र शाळेतील नियमित विद्यार्थी तसेच सहभागी शाळेतील नियमित विद्यार्थी व बहिस्थ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोदणी केंद्र शाळेने करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांचा सदर परीक्षेस वाढता सहभाग विचारात घेता शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या शिफारशीनुसार प्राप्त झालेल्या सर्व शाळांना शासकीय रेखाकला परीक्षा आयोजनाकरिता केंद्र मंजूरी देण्यांत आली आहे..
केंद्र शाळांनी त्यांच्या परिसरातील शाळेतील शासकीय रेखाकला परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणा-या सर्व (नियमित व बहिस्थ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नांव नोंदणी करणे आवश्यक आहे. असे असताना काही केंद्र शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रवेश मर्यादा निश्चित करुन इच्छूक विद्यार्थ्यांची नांवनोंदणी करत नसल्याबाबतच्या तक्रारी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडे प्राप्त होत आहेत.
केंद्र शाळेत बैठक व्यवस्थेपेक्षा अधिकची नांवनोंद होत असेल तर सहभागी शाळेपैकी ज्या शाळेमध्ये प्रशिक्षित (कला शिक्षक पदविका अर्हताधारक) कला शिक्षक कार्यरत आहेत अशा शाळांमध्ये परीक्षेची गोपनियता राखून उर्वरित विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केंद्रशाळेचे मुख्याध्यापक य प्रशिक्षित कलाशिक्षक कार्यरत असलेल्या सहभागी शाळेच्या मुख्याध्यापक यांचे समन्वयाने परीक्षा आयोजनाबाबतचे संपूर्ण कामकाज हाताळावयाचे असते.
गतवर्षीपर्यंत याच पध्दतीने विद्यार्थी नांव नोंदणी व परीक्षा आयोजनावावत कार्यवाही करण्यांत आली होती. ही बाब केंद्र प्रमुखांना विदीत असतानाही काही केंद्रप्रमुख वेगवेगळी कारणे देऊन इतर शाळांतील विद्यार्थ्यांची मर्यादित नांव नोंदणी करत असल्याचे किंवा नांव नोंदणी करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही वाय गंभीर असल्याने शासकीय रेखाकला परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणा-या नियमित/बहिस्थ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नांवनोदणी केंद्रप्रमुख यांनी करणे आवश्यक आहे.
परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणारा कोणताही नियमित/वहिस्थ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्याबाबतची संपूर्ण जवबादारी संबंधित केंद्रशाळेचे मुख्याध्यापक यांची असल्यामुळे विद्यार्थ्याच्या ऑनलाईन नांवनोदणीवावत यापुढे कोणतेही तक्रार प्रकरण उद्भवू नये म्हणून सर्व शिक्षणाधिकारी (माध्यामिक) व शिक्षण निरीक्षक (सर्व) वृहन्मुंबई यांचे स्तरावरुन सर्व शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचित करणे आवश्यक आहे. याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना अवगत करण्याबाबत विनंती आहे.
आपला विश्वासार्ह
(विनोद दांडगे)
संचालक
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ,
मुंबई.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा-२०२४
एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक
परिपत्रक
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा घेण्यात येत होत्या, तथापि, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, अधिनियम २०२३ दि. २३/०२/२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम, २०२३ कलम ८ मधील तरतुदीनुसार सन २०२४-२०२५ पासून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा, मंडळाकडून घेण्यात येणार आहे.
शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुर्नरचित अभ्यासक्रमास दिनांक १६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४, दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ ते दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
संबंधित सर्व केंद्र प्रमुख यांना कळविण्यात येते की, शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करताना दोन्ही पैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी करावी. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन पध्दतीने https://www.msbae.org.in संकेतस्थळावर भरावयाची असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांच्या शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे. या
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता खालील प्रमाणे.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा-२०२४ एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक
ऑनलाईन पध्दतीने करावयाची नोंदणी व संबंधित माहिती https://www.msbae.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. तसेच परीक्षा फी ऑनलाईन भरण्याबाबत स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात येईल.
(विनोद दांडगे)
संचालक,
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.
Previous Update👇
महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, या कार्यालयातून दिनांक 12 जुलै 2023 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार.
शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुर्नरचित अभ्यासक्रमास संदर्भीय दिनांक १६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुर्नरचित अभ्यासक्रमास सन २०१५ पासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२३ चे आयोजन ऑफलाईन पद्धतीने दिनांक ०४ ऑक्टोबर २०२३ ते दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
संबंधित केंद्र प्रमुख यांना कळविण्यात येते की, शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करताना दोन्ही पैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी करावी. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा की ऑनलाईन पध्दतीने
या संकेतस्थळावर भरावयचे असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक सहभागी शाळा यांच्या शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता खालील प्रमाणे.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२३
एलिमेंट्री ड्रॉईंग ब्रेड परीक्षा दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी व 5 ऑक्टोबर 2023 रोजी तर इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 6 ऑक्टोबर 2023 रोजी व सात ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.
सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments