IGNOU Admission 2023 - इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया अपडेट.

महाराष्ट्रात जसे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे तसे राष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे या मुक्त विद्यापीठाची अभ्यास केंद्र महाराष्ट्रात देखील आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात वेगवेगळे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत सदर अभ्यासक्रमासाठी आपण ऑनलाइन प्रवेश अर्ज भरू शकतात.


मुक्त विद्यापीठांच्या माध्यमातून तुम्ही पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन तुमचे शिक्षण आणि स्वप्न पूर्ण करू शकता. घरच्या परिस्थितीमुळे किंवा विविध अडचणीमुळे कॉलेजला जाणे शक्य नसलेल्या अनेकांसाठी मुक्त विद्यापीठ हा एक उत्तम पर्याय असतो. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे त्यातील एक महत्त्वाचे नाव. या विद्यापीठामधील प्रवेशासासाठी काही दिवस उरले असून, इच्छुक विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे.


IGNOU Admission: तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नाव ऐकले असेल. तुमच्या ओळखीतल्या अनेकांचे त्या विद्यापीठामधून शिक्षण झाल्याचे किंवा काहींनी यावर्षी या विद्यापीठांमध्ये प्रवेशही घेतला असेल. काही कारणांमुळे, किंवा घरच्या परिस्थितीमुळे दररोज कॉलेजला जाणे शक्य नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठ वरदान ठरतात.

http://www.ignou.ac.in/

मुक्त विद्यापीठांच्या माध्यमातून तुम्ही पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन तुमचे शिक्षण आणि स्वप्न पूर्ण करू शकता. परंतु, अद्यापही मुक्त विद्यापीठांबाबतीत विद्यार्थी आणि पालकांना फारशी माहिती नसते, आणि याबद्दल म्हणावी तशी जनजागृतीही अद्याप झालेली नाही.


यशवंतराव मुक्त विद्यापीठाइतकेच देश पातळीवरील नावाजलेले मुक्त विद्यापीठ म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (Indira Gandhi National Open University). भारतीय विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) मान्यता असलेले आणि NAAC मान्यताप्राप्त A++ भारतात प्रसिद्ध विद्यापीठ आहे.


IGNOU मध्ये तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये डिस्टन्स लर्निंग (Distance Learning) करू शकता. जर तुम्हाला पदोन्नतीसाठी किंवा तुमची शैक्षणिक पदवीमध्ये भर घालण्यासाठी इग्नूमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर, तुमचे सुरु असलेले काम न सोडता पदवी मिळवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.


विद्यापीठाची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून केली जाते. शिवाय, देशाच्या विविध ठिकाणच्या परीक्षा केंद्रांतून परीक्षा देण्याची मुभाही तुम्हाला IGNOU च्या माध्यमातून मिळते.

http://www.ignou.ac.in/

या विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांविषयी माहिती आणि इतर अनेक बाबींचे अपडेट्स IGNOU च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच, ऑनलाइन अर्जाची लिंक आणि अर्ज करण्याच्या प्रक्रियेविषयीची सखोल माहितीही वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि इतर अभ्यासक्रमांची माहिती मिळवून या मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊ शकता.


विद्यापीठांसाठी प्रवेशाची तारीख ३० जून २०२३ होती, मात्र, आता ही तारीख १५ जुलै २०१२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थी १५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्जाच्या माध्यमातून Indira Gandhi National Open University मध्ये प्रवेश घेऊ शकता.


इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी अधिकृत लींक.


http://www.ignou.ac.in/



 शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.